Thursday 9 January 2020

महेता काॅलेजमधील प्रा.रेश्मा देवरे नेट परीक्षा उत्तीर्ण

पाचगणीच्या प्रा.रेश्मा देवरे नेट परीक्षा
 उत्तीर्ण




 पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील इतिहास विभागातील प्रा.रेश्मा लक्ष्मण देवरे या इतिहास विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.सदरची परीक्षा दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने घेण्यात येते.
     प्रा.रेश्मा देवरे यांनी नेेट परीक्षा उत्तीर्ण केलेबद्दल प्राचार्य डाॅ.अरूण गाडे ,इतिहास विभागप्रमुख प्रा.डाॅ.सुनिता गित्ते यांनी अभिनंदन केले.प्रा.देवरे यांना  पती विशाल मोरे,प्राचार्या डाॅ.भाग्यश्री जाधव,प्रा.गौतम काटकर, डाॅ.आर.बी.सातपुते,डाॅ.विकास सरनाईक,डाॅ.डी.बी.मासाळ यांचे मार्गदर्शन लाभले.प्रा.देवरे या यापूर्वी सेट परीक्षा उत्तीर्ण असून सध्या प्राचार्या डाॅ.भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली " डाॅ.नरेंद्र दाभोळकर यांचे विचार व कार्य " या विषयात पीए.डी चे संशोधन करीत आहेत.

No comments:

Post a Comment