Tuesday 18 February 2020

साहित्य व चित्रपट निर्मितीतून सामाजिक परिवर्तन घडवावेःडाॅ.विनायक पवार















साहित्य व चित्रपट निर्मितीतून सामाजिक परिवर्तन घडवावेःडाॅ.विनायक पवार

पाचगणीः समाजामध्ये नैतिक मूल्यांचे घसरण वाढत चालले आहे.त्यामुळे सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आदी प्रश्न नव्याने निर्माण होत आहेत.समाजातील सामाजिक प्रश्न सोडविण्याची क्षमता साहित्य व चित्रपटनिमिर्तीतआहे.साहित्यिकांनी साहित्य व चित्रपट निर्मितीतून समाजात सामाजिक परिवर्तन घडवावे आणि नवसमाजनिर्मिती करावी,असे प्रतिपादन प्रसिध्द कवी व चित्रपट गीतकार डाॅ.विनायक पवार यांनी व्यक्त केले.

    श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये वार्षिक पारितोषिक व बक्षिस वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. अरूण गाडे होते.यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर बिरामने,युवाउद्योजक नितीन भिलारे,संजय आंब्राळे,रोटरी कल्बचे सचिव सुनिल कांबळे, सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ.शहाजी जाधव,कार्याध्यक्ष प्रा.नरेंद्र फडतरे,जिमखाना प्रमुख प्रा.दत्तात्रय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
   डाॅ.विनायक पवार यांनी सादर केलेल्या कविता व चित्रपट गितांना रसिकांनी मनमुराद दाद दिली.प्रारंभी प्रमुख मान्यवरांना हस्ते शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रिडा आदी क्षेत्रात यशप्राप्त विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना बक्षिसे देण्यात आली.यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.प्रास्ताविक प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी केले.पाहुण्यांची ओळख डाॅ.तुकाराम राबाडे यांनी करून दिली.कार्याध्यक्ष प्रा.नरेंद्र फडतरे यांनी अहवाल वाचन केले.जिमखाना प्रमुख प्रा.दत्तात्रय मोहिते यांनी क्रिडा अहवाल सादर केला.सूत्रसंचालन डाॅ.प्रियदर्शनी कांबळे व प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार डाॅ.गोपीनाथ बोत्रे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटोओळीः महेता काॅलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलताना डाॅ.विनायक पवार,बाजूस प्राचार्य डाॅ.अरूण गाडे,माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे आदी

Wednesday 12 February 2020

तरूणांनी कृषी क्षेत्रात रोजगारनिर्मिती करावीःप्रकाशराव कुतवळ
















तरूणांनी कृषी क्षेत्रात रोजगारनिर्मिती करावीःप्रकाशराव कुतवळ
 
पाचगणीः मराठी तरूणांना कृषी क्षेत्रात रोजगार व उद्योग निर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.कृषीमधील नवीन बदल व गरजा लक्षात घेवून तरूणांनी करिअर घडविण्यासाठी पुढे यावे,असे प्रतिपादन  उर्जा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाशराव कुतवळ यांनी व्यक्त केले. 
   श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी काॅलेज योजना अंतर्गत काॅमर्स विभागाने आयोजित केलेल्या " कृषीउद्योगातील करिअरच्या  संधी  " या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी काॅमर्स विभागप्रमुख डाॅ.गोपीनाथ बोत्रे,अग्रणी काॅलेजचे प्रमुख प्रा.संतोष निलाखे,प्रा.प्रशांत सुतार,डाॅ.आलिम जाफर यांची प्रमुख उपस्थिती होती.
      प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,ग्रामीण तरूणांनी शेती व पूरक व्यवसायाकडे रोजगार व उद्योग म्हणून पाहावे.शेतीतील उत्पादनाची बाजारपेठ गावोगावी निर्माण करावी आणि त्यानुसार बाजारपेठ निर्माण करावी.
    प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डाॅ.गोपीनाथ बोत्रे यांनी करून दिली.सूत्रसंचालन सरिता चोपडे हिने केले.आभार सुजाता मालुसरे हिने मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटोओळीः महेता काॅलेजमध्ये कार्यशाळेत बोलताना उद्योजक प्रकाशराव कुतवळ बाजूस प्राचार्य डाॅ.अरूण गाडे डाॅ.गोपीनाथ बोत्रे आदी

Sunday 2 February 2020

वाईच्या चित्रकला स्पर्धेत आर्येशा कस्तुरे प्रथम











वाईच्या चित्रकला स्पर्धेत आर्येशा कस्तुरे  प्रथम

वाईः येथील श्री कृष्णाबाई संस्थान भिमाशंकर घाट यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत आर्येशा अनंता कस्तुरे हिने प्रथम क्रमांक मिळविला.तिला टाॅृफी व प्रशस्तीपत्रक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
    आर्येशा कस्तुरे ही रमेश गरवारे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दुसर्‍या इयत्तेत शिकते.तिला श्री कृष्णाबाई संस्थानचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व सचिव प्रभाकर जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.आर्येशाने मिळविलेल्या यशाबद्दल रमेश गरवारे स्कूलमध्ये मुख्याध्यापिका सौ.सुषमा जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आर्येशा हिला चित्रकलेच्या शिक्षिका सोनाली शेलार, क्रियेटिव्ह ड्राॅयिंग अॅण्ड पेंटिंग क्लासेसच्या प्रमुख गुलनाज साजिद मुल्ला ,अंजना कस्तुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
फोटोओळीः वाई चित्रकला स्पर्धेतील बक्षिस स्वीकारताना आर्येशा कस्तुरे व इतर