Tuesday 17 January 2023

महेता काॅलेजमध्ये ज्ञानशिदोरी दिनानिमित्त वाचन कट्टा,ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ वाटप उपक्रम संपन्न*





*महेता काॅलेजमध्ये ज्ञानशिदोरी दिनानिमित्त वाचन कट्टा,ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ वाटप उपक्रम संपन्न* 

पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा करण्यात आला.यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन,वाचन कट्टा,ग्रंथ वाटप उपक्रम प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले.मराठी विभाग,सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांना विद्यार्थी व गुरूदेव कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

           महेता काॅलेजमध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस  ज्ञानशिदोरी दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करणेत आला.
 *शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे वाचन कट्टा* 
     
   स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह अंतर्गत मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्यावतीने ज्ञानशिदोरी दिन व मराठी भाषा संर्वधन पंधरवडा निमित्त  शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे वाचन कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.वाचन कट्टा अंतर्गत शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे पुतळा परिसर व क्रिडागंणावर संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे वाचन कट्टा,मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे वाचन कट्टा,डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा,कवी कुसुमाग्रज वाचन कट्टा,वि.स.खांडेकर वाचन कट्टा असे विविध वाचन कट्टे तयार करण्यात आले.या वाचन कट्यावर विद्यार्थी,विद्यार्थीनी व प्राध्यापकांना ग्रंथालयातील विविध विषय व आशय असणारी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.या वाचन कट्टा उपक्रमास वाचकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला.वाचकांनी या पुस्तकांचे वाचन करून उपक्रमाबद्दल कौतुक केले.
      प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांच्या हस्ते या वाचन कट्यांचे उद् घाटन करण्यात आले.प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले, ज्ञानशिदोरी दिनानिमित्त राबविलेला हा उपक्रम सर्वांना प्रेरणादायी असा आहे.वाचन संस्कृती विद्यार्थ्यांच्यात रूजावी व पुस्तकांची ओळख व्हावी यासाठी वाचन कट्यांचे आयोजन उपयुक्त ठरेल.प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे यांनी केले.संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.नरेंद्र फडतरे व  प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.यावेळी डाॅ.बी.एन.कोकरे,प्रा.सतीश कुदळे ,डाॅ.शहाजी जाधव यांच्यासह प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. आभार ग्रंथपाल प्रा.राजेंद्र खंडाईत यांनी मानले.वाचन कट्याचा लाभ सर्व विद्यार्थी व वाचकांनी घेतला. 

 *ज्ञानशिदोरी दिनानिमित्त 78 ग्रंथांचे वाटप* 
      महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग,मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा 78 व्या वाढदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा करण्यात आला.यानिमित्ताने प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांच्या संकल्पनेतून प्राचार्य,प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांच्याकडून संकलित केलेले  विविध विषयावरील 78  ग्रंथ  हे 78 विद्यार्थ्यांना  प्राचार्य डाॅ.सतीश देसाई व सर्व गुरूदेव कार्यकर्ते यांच्या हस्ते भेट देण्यात आले.
    यावेळी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले,पुस्तके ही वाचकांच्या जीवनाला आकार देत असतात.आयुष्य घडवित असतात.कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी ज्ञानार्जन,वाचन व संस्काराला महत्व देत सर्वांना शिक्षणाचे धडे दिले.त्यांचा वाढदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा होतोय हे प्रेरणादायी असे आहे.विद्यार्थ्यांना ज्ञानशिदोरी म्हणून भेट दिलेले ग्रंथ विद्यार्थ्यांच्या करिअरला व आयुष्याला वळण देणारे ठरतील.विद्यार्थ्यांनी दिलेली पुस्तके वाचून जीवनात परिवर्तन घडवावे.
   प्रा.माणिक वांगीकर यांनी ज्ञानशिदोरी दिनानिमित्त मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा जीवन प्रवास मनोगतातून अधोरेखित केला.प्रा.वांगीकर म्हणाले , शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांचा वारसा संस्थेचे कार्याध्यक्ष  मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे सक्षमपणे चालवित आहेत.त्यांचे शिस्तप्रिय,अभ्यासू व सर्वसमावेशक असे गुणपैलू उल्लेखणीय असे आहेत.सर्वांनी ज्ञान व संस्काराचा वारसा पुढे जतन करावा. 
    प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे यांनी केले.यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.नरेंद्र फडतरे,विज्ञान विभाग प्रमुख डाॅ.बी.एन.कोकरे,कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.सतीश कुदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.आभार ग्रंथपाल प्रा.राजेंद्र खंडाईत यांनी मानले.कार्यक्रमास विद्यार्थी  व गुरूदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

 *ग्रंथ प्रदर्शन* 
 ज्ञानशिदोरी दिनानिमित्त सांस्कृतिक विभाग,मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रंथ प्रदर्शनाचे उद् घाटन प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान मा.नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे यांनी सहपरिपार ग्रंथ प्रदर्शनास सदिच्छा भेट देवून ज्ञानशिदोरी दिनानिमित्त राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
    या ग्रंथ प्रदर्शनात चरित्र- आत्मचरित्र,स्पर्धा परीक्षा,क्रीडा , नियतकालिके, संदर्भ ग्रंथ असे विविध विभाग करून तशी पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनास विद्यार्थी व प्राध्यापकांनी भेट देवून उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. नरेंद्र फडतरे यांनी केले. आभार ग्रंथपाल प्रा.राजेंद्र खंडाईत यांनी मानले. संयोजन पंढरीनाथ भिलारे ,बिरा घोगरे व अशोक पडसरे यांनी केले.