Sunday 12 January 2020

विवेकानंदाचे तत्वज्ञानच तरूणांना सामर्थ्यशाली बनवेलःडाॅ.अभय देशपांडे















विवेकानंदाचे तत्वज्ञानच तरूणांना सामर्थ्यशाली बनवेल : डाॅ.अभय देशपांडे

पाचगणीः स्वामी विवेकानंदाचे विचार आणि तत्वज्ञान सर्वासाठीआदर्श व प्रेरणादायी आहे.तरूणांनी स्वामी विवेकानंदाचे तत्वज्ञान आत्मसात करून व्यक्तिमत्व सामर्थ्यशाली बनवावे,असे प्रतिपादन डाॅ.अभय देशपांडे यांनी व्यक्त केले.
    श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने  स्वामी विवेकानंद व राष्टृमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात व विवेकानंद सप्ताहच्या उद् घाटनप्रंसगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ अरूण गाडे होते.यावेळी डाॅ.बाळासाहेब कोकरे,प्रा.यू.बी.जाधव,डाॅ.गोपीनाथ बोत्रे,सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ.शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
  प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षण संस्थेला स्वामी विवेकानंद  हे नाव देवून आणि विवेकानंद सप्ताह सुरू करून स्वामी विवेकानंदाचे कार्य व तत्वज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहचविले.राष्टृमाता जिजाऊ माॅसाहेब यांनी समाजाला आदर्श मातेचे संस्कार व शिकवण दिली.तरूणांनी महापुरूषांचे आदर्श घेवून जीवनाला आकार द्यावा.
प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी   मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. 
 
फोटोओळी - महेता काॅलेजमध्ये विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यानात बोलताना डाॅ.अभय देशपांडे बाजूस प्राचार्य डाॅ.अरूण गाडे आदी

No comments:

Post a Comment