Tuesday 16 November 2021

महेता काॅलेजमध्ये मराठी विभागाच्यावतीने " जय भिम " चित्रपटाचे सादरीकरण

 













पाचगणीः महेता काॅलेजमध्ये मराठी विभागाच्यावतीने USE OF ICT चा वापर करीत " जय भीम " चित्रपट दाखविण्यात आला.विद्यार्थ्यांनी यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा व तत्वज्ञानावरील चर्चेत सहभाग घेतला.
    इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.जयंत शिंदे यांनी आदिवासी कायदे याविषयी माहिती सांगितली.डाॅ.अनंता कस्तुरे यांनी जय भिम चित्रपट कथा , संवाद, दिग्दर्शन,गीते, कथानक आदीविषयी माहिती सांगितली.आभार डाॅ.वामन सरगर यांनी मानले.

Monday 1 November 2021

मराठी विभागाचा पाचवड काॅलेजशी सामज्यश करार




ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" -                    शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
*श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज, पाचगणी*
                           आणि
*यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड*
*मराठीी वििभाग यांच्यात लिंकेज*
*शैक्षणिक वर्ष 21-22*
*लिंकेज*
*मराठी विभाग*
👇 *शनिवार, 30/10/2021*
*ठिकाण : श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज पाचगणी*
*श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज पाचगणी व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड* *विविध विभागा*अंतर्गत विविध उपक्रमांसाठी *पाच वर्षासाठी* लिंकेजेस करण्यात आले.
यामध्ये
१ ) राष्ट्रीय / राज्यस्तरीय परिषद, विविध सेमीनार ,वर्कशॉप , एक दिवसीय कार्यशाळा .२ ) स्टाफ एक्सेंज ३ ) व्याख्याने ४ ) संशोधना संदर्भात कार्यशाळा
इत्यादी उपक्रम दोन्ही महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहेत.

या लिंकेज प्रसंगी *प्रो .डॉ . किरण शिंदे यांनी वरील लिंकेजस कार्यरत रहावेत व अनोखे उपक्रम राबवावेत, असे आoहान केले . तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे *प्र.प्राचार्य डॉ.प्रदिप शिंदे . यांनी या लिंकेजच्या माध्यमातून दोन्ही महाविद्यालयांच्या विभागांच्या माध्यमातून अनेक नॅक धरतीवरती अनेक उपक्रम राबवून महाविद्यालयांची गुणवत्ता वाढविणार असल्याचे स्पष्ट केले . समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा .संतोष निलाखे, यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सतीश कुदळे यांनी मानले.या प्रसंगी दोन्ही महाविद्यालया स्टाफ उपस्थित होता*
या लिंकेजसाठी महाविद्यालयाचे* *प्र.प्राचार्य प्रो.डॉ. किरण शिंदे प्र . प्राचार्य डॉ . प्रदिप शिंदे ( यशवंतराव चव्हाण . महाविद्यालय पाचवड ) डॉ. बाळासाहेब कोकरे, डॉ. शहाजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले*