Tuesday 18 January 2022

LGBTIQA समूहाला समजावून घेत माणूसकीचा हात द्यावाः विशाल पिंजानी



 महेता काॅलेजमध्ये LGBTIQA समूहाच्या प्रश्नांवर कार्यशाळा संपन्न









पाचगणी: समाजात समलिंगी,उभयलिंगी,तृतीयपंथी,टाृन्सजेंडर,इंटरसेक्स व क्युअर समूहाचे नोकरी,उद्योग,शिक्षण,बेकारी,आरोग्य,असमानता,लिंगभेद असे अनेक प्रश्न आहेत.मुळात या समूहाला कोणीही माणुसकीच्या व समानतेच्या पातळीवर समजावून घेत नाही.त्यामुळे हा समूह आत्महत्याकडे वळत आहे.शासन,सामाजिक संघटना व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी तृतीय पंथी समूहाला समजावून घेत माणूसकीचा हात द्यावा असे आवाहन LGBTIQA समूहाच्या " अभिमान " संस्थेचे संस्थापक,प्रेरक वक्ते व कोल्हापूरचे प्रसिध्द उद्योजक मा.विशाल पिंजानी यांनी व्यक्त केले.
   पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभाग व विवेकवाहिनी समिती यांच्यावतीने शिवाजी विद्यापीठ अग्रणी काॅलेज अंतर्गत "सर्वसमावेशक व सशक्त समाजासाठी LGBTIQA समूहाला समजून घेताना " या   विषयावरील एकदिवसीय आॅनलाईन  कार्यशाळेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे होते.यावेळी कोल्हापूरच्या LGBTIQA समूहाची सामाजिक कार्यकर्ती अमायरा आडवाणी,मराठी विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,विवेकवाहिनीचे प्रमुख डाॅ.वामन सरगर,अग्रणी काॅलेजचे प्रमुख प्रो.डाॅ.राजू गणेशवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    मा.अमायरा आडवाणी म्हणाल्या ,LGBTIQA समूहाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत.सर्व स्तरातील लोकांनी त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.त्यांनी आपल्या अनुभवातून समूहाबद्दलची माहिती व सद्यस्थिती सांगितली.

    प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे म्हणाले,LGBTIQA समूहाबद्दलच्या अडचणी,प्रश्न,समज,गैरसमज याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.या समूहाला सर्वांनी माणूसकीचा हात देणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाची सुरूवात शिक्षणमहर्षी डाॅ बापूजी साळुंखे लिखीत संस्था प्रार्थनेने झाली.प्रास्ताविक,पाहुण्यांची ओळख, सूत्रसंचालन व आभार मराठी विभाग प्रमुख डाॅ अनंता कस्तुरे यांनी मानले.तंत्रसहाय्य डाॅ.सुनील गुरव यांनी केले.कार्यशाळेत डाॅ.मिलिंद सुतार ,प्रा.जयंत शिंदे आदींनी विचारलेल्याप्रश्नांना विशाल पिंजानी व अमायरा आडवाणी यांनी उत्तरे दिली. विचारलेनलाईन कार्यशाळेस प्राध्यापक,विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
    

Thursday 13 January 2022

विज्ञान साहित्य विषयावर राज्यस्तरीय संपन्न






गावोगावी वैज्ञानिक साहित्याचा जागर व्हावाः डाॅ.नीलेश तरवाळ













 पाचगणीः जागतिक स्तरावर वैज्ञानिक साहित्य हे कथा,शोधनिबंध,लेख,कादंबरी आदी साहित्य प्रकारातून लिहिले जात आहे.नवीन तंत्रज्ञान,शोध,बदलते पर्यावरण आदी विषयाबाबत साहित्यातून जनजागृती होणे काळाची गरज आहे.नवोदित संशोधक व साहित्यिकांनी वैज्ञानिक साहित्याचा जागर गावोगावी करावा असे आवाहन युवा शास्रज्ञ डाॅ.नीलेश तरवाळ यांनी केले.
      श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये विवेकानंद जयंती सप्ताह,मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व जागतिक विज्ञान साहित्य दिवस निमित्ताने इंग्रजी,मराठी व हिंदी विभागाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय वेबिनारमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे होते.या वेबिनारमध्ये इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.जयंत शिंदे,हिंदी विभाग प्रमुख प्रा.नरेंद्र फडतरे,मराठी विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,तंत्रसहाय्यक व वेबिनारचे संयोजक डाॅ.सुनील गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
      प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे म्हणाले,वैज्ञानिक साहित्यामध्ये पर्यावरण,सौर उर्जा,प्रदूषण,जलसंवर्धन अशा अनेक विषयांचे चित्रण आढळते.युवकांनी व संशोधकांनी वैज्ञानिक साहित्याच्या चळवळीत सहभागी होवून साहित्याला गती द्यावी.
     वेबिनारचा प्रारंभ शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे लिखित संस्था प्रार्थनेने करण्यात आला.प्रास्ताविक डाॅ.अनंता कस्तुरे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.जयंत शिंदे यांनी करून दिला.सूत्रसंचालन व तंत्रसहाय्य डाॅ.सुनील गुरव यांनी केले.आभार डाॅ.शहाजी जाधव यांनी मानले.वेबिनारला प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.