Tuesday 14 January 2020

पाचगणीच्या इतिहासाचा रोटरी क्लबने केला औरंगाबादमध्ये जागर







पाचगणीच्या इतिहासाचा रोटरी क्लबने केला औरंगाबादमध्ये जागर
 
पाचगणीःरोटरी क्लब आॅफ पाचगणीने " रोटरी जगाला जोडते" या ब्रीदवाक्याप्रमाणे वडोद खुर्द ता.फुलंब्री जि.औरंगाबाद येथे जावून शालेय विद्यार्थ्यांमध्ये छ.शिवाजी महाराजांचे कार्य, पाचगणीचा इतिहास व महत्व आदी विषयीचा जागर केला आणि भेटवस्तू देत शिक्षक व विद्यार्थ्यांना पाचगणीला भेट देण्याचे आवाहन केले.
     रोटरी क्लब आॅफ पाचगणी समाजामध्ये सातत्याने विविध सामाजिक,सांस्कृतिक आदी उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबवित असते.रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि,सचिव सुनील कांबळे,माजी अध्यक्ष सुरेश बिरामणे,सदस्य अशोक पाटील,आर्दे सवार्द आदीजन औरंगाबादमध्ये रोटरीच्या वार्षिक परिषदेमध्ये सहभागी झाले होते.दरम्यान सर्वांनी औरंगाबाद,दौलताबाद किल्ला,एलोरा लेणी आदी ठिकाणी भेटी दिल्या.या भेटीदरम्यान वडोद खुर्द ता.फुलंब्री येथील जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची भेट घेतली.यावेळी मार्गदर्शन करताना रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानवर्दि म्हणाले,रोटरी जगाला जोडते या ब्रिदवाक्याप्रमाणे पाचगणी रोटरी क्लब सामाजिक उपक्रम म्हणून वडोद खुर्दच्या जिल्हा परिषद शाळेस पाचगणी क्लबशी जोडत आहोत.शिक्षक व विद्यार्थ्यांनी पाचगणी परिसरास भेट देवून येथील निसर्ग,इतिहास आदीची माहिती जाणून घ्यावी.यासाठी रोटरी क्लब सर्वप्रकारचे सहकार्य करील.
     रोटरी क्लबने औरंगाबादमध्ये जावून पाचगणीच्या इतिहासाचा जागर केल्याबद्दल क्लबचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.प्रास्ताविक रोटरीचे सचिव सुनील कांबळे यांनी केले.आभार अशोक पाटील यांनी मानले.यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment