Sunday 27 February 2022

वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यात मराठी भाषेचे योगदान महत्वाचेः सरोजकुमार मिठारी









पाचगणीः जागतिक स्तरावर  मराठी भाषेतील साहित्य हे कथा,कविता,लेख,कादंबरी आदी साहित्य प्रकारातून लिहिले जात आहे.जगातील अनेक देशात मराठी भाषा बोलली जाते.मराठी भाषेने वाचन संस्कृती,साहित्य संमेलने,दिवाळी अंकाची परंपरा टिकवून ठेवली.अशा मराठी भाषेचा गौरव व जनजागृती करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाईचे विद्याव्यासंगी सहाय्यक संपादक व प्रसिध्द लेखक सरोजकुमार मिठारी यांनी केले.
      श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज पाचगणी व गिरिस्थान कला व वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्र्वर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित " मायबोली मराठी " या विषयावरील आॅनलाईन व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.यावेळी प्राचार्य डाॅ.चंद्रकांत कदम,मराठी विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,डाॅ.एस.बी.रणदिवे,डाॅ.वामन सरगर,प्रा.माणिक वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      प्र.प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले,ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.मराठी भाषेत विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती झालेली आहे.भारतातील मराठी भाषा ही प्रमुख भाषेपैकी एक आहे.समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार्‍या जनजागृती चळवळीत सहभागी होवून मराठी भाषेचा गौरव करावा.
       प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डाॅ.अनंता कस्तुरे यांनी करून दिला. केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.एस.सी.नालबंद  यांनी मानले.आॅनलाईन व्याख्यानास प्राध्यापक व विद्यार्थी व मराठी भाषाप्रेमी उपस्थित होते.

Thursday 10 February 2022

शासनाच्या ' करिअर कट्टा ' स्पर्धेत कोल्हापूर विभागात महेता काॅलेजची उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड



 पाचगणी : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2021 -22 मध्ये  करिअर कट्टा अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागातून श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजची उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली.सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात निवड झालेले महेता काॅलेज एकमेव आहे अशी माहिती प्र.प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांनी दिली.
       
         प्र.प्राचार्यडाॅ.सतीश देसाई म्हणाले, महेता काॅलेजमध्ये युवकांच्यात करिअर निवड ,स्पर्धा परीक्षा, उद्योजकता विकास याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने करिअर कट्टा उपक्रम राबविण्यात येतो.काॅलेजमध्ये करिअर कट्टा उपक्रम  करिअर कट्टाचे समन्वयक डाॅ.अनंता कस्तुरे,डाॅ.तुकाराम राबाडे,डाॅ.प्रियदर्शनी कांबळे आदीजण राबवित आहेत. प्र.प्राचार्य प्रो. डाॅ.किरण शिंदे यांचेही यासाठी मार्गदर्शन लाभले आहे.करिअर कट्टा उपक्रमातंर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग व तंत्रसहाय्यता केंद्र यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन व आॅफलाईन आय.पी.एस.अधिकारी,उद्योजक आदींची व्याख्याने आयोजित केली जातात. काॅलेजमध्ये विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके व अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच काॅलेजमध्ये अनिवासी पोलीस व सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात आले आहे.गतवर्षी महाविद्यालयातील वृषाली राजपूरे हिची शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमातंर्गत स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली .वृषाली राजपुरे हिला शासनाची 80 हजार रूपये किंमतीची पुस्तके, प्रशिक्षण व संदर्भ ग्रंथ मिळाले आहेत.

   करिअर कट्टा उपक्रमाचे समन्वयक डाॅ.अनंता कस्तुरे म्हणाले,  सन 2021 -22 मध्ये राज्यातील विविध महाविद्यालये करिअर कट्टा उपक्रमात सहभागी झाली होती.कोल्हापूर विभागातून तसेच शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातून महेता काॅलेजची उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून एकमेव निवड करण्यात आली आहे.राज्य शासनाचे उत्तेजनार्थ पारितोषिक,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम काॅलेजला मिळणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्टृ माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.
     महाविद्यालयाच्या या निवडीबद्दल श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे,सचिव प्राचार्या सौ.शुभांगी गावडे,प्रशासन सहसचिव प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ,अर्थ सहसचिव प्राचार्य एस.एम.गवळी,मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे आदींनी काॅलेजचे करिअर कट्टा उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक व अभिनंदन केले.