Friday 26 February 2021

महेता काॅलेजमध्ये " मायबोली " भित्तिपत्रिकेचे अनावरण


" मायबोली " भित्तिपत्रिका अनावरण


प्रतिमापूजन करताना प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे



मराठी भाषा गौरव दिन


दीपप्रज्वलन करताना प्रा.अनंता कस्तुरे



विद्यार्थींनीचे स्वागत करताना प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे



आभार मानताना प्रा.माणिक वांगीकर


पाचगणी: श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित " मायबोली " भित्तिपत्रिकेचे अनावरण प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने प्रत्येकवर्षी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.यावर्षीप्रतिमापूजन,भित्तिपत्रिका अनावरण व मराठी शुध्दलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.भित्तिपत्रिकेच्या अनावरणप्रसंगी प्रास्ताविकात मराठी विभागप्रमुख प्रा.अनंता कस्तुरे यांनी मराठी भाषेचे जागतिक स्तरावरील महत्व विषद केले.प्रारंभी प्र.प्राचार्य,प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.आभार प्रा.माणिक वांगीकर यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Friday 12 February 2021

पाचगणीकर " बंध नात्यांचा गंध कवितांचा " कार्यक्रमात मंत्रमुग्ध

पाचगणीकर "बंध नात्यांचा गंध कवितांचा" कार्यक्रमात मंत्रमुग्ध

पाचगणीः शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेत प्रा.सौ.लता ऐवळे यांनी " बंध नात्यांचा गंध कवितांचा " या कवितेच्या कार्यक्रमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी सादर केलेल्या बाप,फोर जी डाउनलोडिंग,असं पत्रात लिहा या कवितांला व जात्यांवरच्या ओव्यांना रसिकांनी मनमुराद दाद दिली.
पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी
साळुंखे व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंपताना "बंध नात्यांचा गंध कवितांचा " या विषयावरील
व्याख्यान्यात प्रा.सौ.लता ऐवळे यांनी कविता सादर केल्या.अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्षा सौ.सुलभा लोखंडे होते. यावेळी प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे, प्राचार्य यशवंत फरांदे,जगन्नाथ शिंदे गुरूजी, जे.के.आंब्राळे,मनोहर
समन्वयक डॉ.भाऊराव दांगट,सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ.सुलभा लोखंडे म्हणाल्या पाचगणीतील व्याख्यानमालेने चांगल्या कार्याची परंपरा निर्माण केली आहे.घराघरात चांगले संस्कार करण्याचे कार्य उल्लेखनिय आहे. प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय प्रा.सुनील नवघरे यांनी करून
दिला.सूत्रसंचालन डाॅ.तुकाराम राबाडे व सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे यांनी
मानले.यावेळी प्रा.सौ.लता ऐवळे यांच्या हस्ते भाग्यवंत श्रोता कुपन काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात
आली.यावेळी प्रा.सौ.लता ऐवळे यांच्या हस्ते प्रा.माणिक वांगीकर यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानास
प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

 फोटोओळी : पाचगणी येथे महेता काॅलेज आयोजित व्याख्यानमालेत बोलताना प्रा.सौ.लता ऐवळे बाजूस उपनगराध्यक्षा सौ.सुलभा लोखंडे,प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे, जगन्नाथ शिंदे गुरूजी आदी.

Thursday 11 February 2021

तरूणांनी छ.शिवरायांची जीवनमूल्ये आत्मसात करून यशाचा गड जिंकावा : प्रशांत देशमुख

तरूणांनी छ.शिवरायांची जीवनमूल्ये आत्मसात करून यशाचा गड जिंकावाः प्रशांत देशमुख


















पाचगणी .छ.शिवाजी महाराजांची राजकीय,सामाजिक,धार्मिक,नैतिक आदी जीवनमूल्ये ही जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी अशी आहेत.तरूणांनी छ. शिवरायांची सर्व जीवनमूल्ये आत्मसात करून जीवनाच्या यशाचा गड जिंकावा असे आवाहन प्रसिध्द शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी व्यक्त
केले.
           पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंपताना " प्रतापगडचे युध्द " या विषयावरील व्याख्यानात देशमुख बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे होते. यावेळी प्रविण भिलारे,शशिकांत भिलारे,प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे, प्राचार्य यशवंत फरांदे,जगन्नाथ शिंदे गुरूजी,सरपंच जानू पांगारे,मंगेश उपाध्ये,डाॅ.अनिल बोधे,जे.के.आंब्रांळे,संपत खरात,समन्वयक डॉ.भाऊराव दांगट,सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

      अध्यक्षस्थानावरून बोलताना नानासाहेब कासुर्डे म्हणाले,पाचगणीतील व्याख्यानमालेने चांगल्या विचारांची पेरणी केल्यामुळेच पाचगणीचा सर्वांगिण विकास झाला. महेता काॅलेजचे शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी महाबळेश्र्वर तालुका समन्वयक समितीचे अध्यक्ष प्रविण भिलारे यांनी मनोगत व्यक्त केले.
      पाहुण्यांचा परिचय प्रा.नरेंद्र फडतरे यांनी करून
दिला.सूत्रसंचालन डाॅ.प्रियदर्शनी कांबळे व सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.सतीश कुदळे यांनी मानले.यावेळी मा.प्रशांत देशमुख यांच्या हस्ते भाग्यवंत श्रोता कुपन काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.मा.देशमुख यांच्या हस्ते एलआयसीचा पुरस्कार प्राप्त केलेबद्दल संजय आंब्राळे यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानास
प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

 फोटोओळी : पाचगणी येथे महेता काॅलेज आयोजित व्याख्यानमालेत बोलताना मा.प्रशांत देशमुख बाजूस माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे,प्रविण भिलारे ,प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे,समाजसेवक राम जाधव आदी.

Wednesday 10 February 2021

ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कारानेच समाजपरिवर्तन घडेलः डाॅ.इंद्रजीत देशमुख



              डाॅ.इंद्रजीत देशमुख

प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे     
दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन
नगराध्यक्षा लक्ष्मीताई कर्‍हाडकर सत्कार

भाग्यवंत श्रोता बक्षीस वितरण

उपस्थित मान्यवर व श्रोते


पाचगणीः शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुखे यांनी सांगितलेले ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार हे
तत्वज्ञानच समाजपरिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरीत आहे.तरूणांनी व्यसनाधिनता,चंगळवाद,भ्रष्टाचार या प्रवृत्ती दूर
करून सुसंस्काराची समाजात पेरणी करावी असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते डॉ.इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त
केले.
पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी
साळुंखे व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंपताना " ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार जगण्याचा मूलमंत्र " या विषयावरील
व्याख्यान्यात डॉ.देशमुख बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रसिध्द साहित्यिक जगन्नाथ शिंदे गुरुजी
होते.व्याख्यानमालेचे उदघाटन नगराध्यक्षा लक्ष्मीताई क-हाडकर यांच्या हस्ते झाले.यावेळी प्र.प्राचार्य
डॉ.बी.एन.कोकरे,सामाजिक कार्यकर्ते विकासअण्णा शिंदे,माजी उपनगराध्यक्षा सौ.सुलभा लोखंडे, रोटरीचे अध्यक्ष
किरण पवार,समन्वयक डॉ.भाऊराव दांगट,सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना जगन्नाथ शिंदे गुरुजी म्हणाले,पाचगणीने व्याख्यानमालेद्वारे ज्ञान संपादनाची
वैभवशाली परंपरा जपली आहे.महेता कॉलेजने शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिकदृष्टीने घडविलेले
समाजपरिवर्तन उल्लेखनीय आहे.
प्रास्ताविक प्र.प्राचार्य डॉ.बी.एन.कोकरे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ.मिलींद सुतार यांनी करून
दिला.सूत्रसंचालन सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार समन्वयक डॉ.भाऊराव दांगट यांनी
मानले.यावेळी डॉ.इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते भाग्यवंत श्रोता कुपन काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात
आली.माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार डॉ.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.व्याख्यानास
प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tuesday 9 February 2021