Monday 20 January 2020

पाचगणीच्या पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार,दि.22 रोजी बैठकीचेआयोजन





पाचगणीच्या पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार,दि.22 रोजी बैठकीचे आयोजन


पाचगणी -:  पाचगणीच्या पर्यावरण संवर्धनासाठी पाचगणी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे.वेळोवेळी लागणार्‍या वणव्याचे सत्र शमविण्यासाठी रोटरीने बुधवार दि. २२ रोजी सांयकाळी 7 वाजता पाचगणी परिसरातील प्रत्येक गावतील पोलीस पाटील, निसर्ग प्रेमी व सरपंचांची बैठक आयोजित केली आहे.या बैठकीत वणव्याबाबतचे कायदे,उपाययोजना आदीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन गुरेघर ( ता महाबळेश्वर ) येथील वनपरिमंडळ अधिकारी  सुनील लांडगे व रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि यांनी केले आहे.
  पाचगणी परिसरातील डोंगररांगेत , रानावनात  अनेकवेळा वणवा लागतो त्यामुळे निसर्गाची ऱ्हास  होते त्याचबरोबरबच पक्षी व जमिनीवर वावणारे, सरपटणारे प्राणी होरपळून जातात . शासनाच्या वतीने दरवर्षी  या बाबत उपाय योजना केल्या जातात मात्र वनव्यांचे सत्र सुरूच असते . वणव्या बाबत  जनजागृती मोहीम अधिक गतिमान व्हावी या हेतूने रोटरी क्लबने स्थानिक युवा मंडळे , निसर्ग प्रेमी आदींची बैठकआयोजित केल्याचे रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि यांनी सांगितले . रोटरी क्लबने आयोजित केलेल्या बैठकीस  मालकी पांचगणी क्लब येथे बुधवारी सायंकाळी ७.०० वाजता निसर्गप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरीचे सचिव सुनील कांबळे यांनी केले आहे .

No comments:

Post a Comment