Friday 24 January 2020

युवकांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करावीःडाॅ.अनिलकुमार वावरे






युवकांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करावीः डाॅ.अनिलकुमार वावरे

 पाचगणीः जागतिक स्पर्धेत भारतीय अर्थव्यवस्था कुमकुवत होत चालली आहे.यामुळेच भारत देश अविकसीत देशांच्या यादीत समाविष्ठ झाला आहे.भारताला आर्थिकदृष्टीने मजबूत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,असे मत शिवाजी विद्यापीठ अर्थशास्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डाॅ.अनिलकुमार वावरे यांनी व्यक्त केले.
   पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये अर्थशास्र विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठ अग्रणी काॅलेज योजना अंतर्गत " भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने " या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी किसनवीर काॅलेजचे अग्रणी काॅलेजचे  प्रमुख डाॅ.संजय धोंडे,प्रा.गावित,अर्थशास्र विभागप्रमुख प्रा.सतिश कुदळे,डाॅ.तुकाराम राबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,युवकांनी उद्योग,शेती आदी क्षेत्रात करिअर करावे.भारतीय अर्थव्यवस्थेला तरूणच मजबूत बनवतील.
   प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते "नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांचे आर्थिक विचार " या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक डाॅ.तुकाराम राबाडे यांनी केले.डाॅ.संजय धोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रा.रेश्मा देवरे यांनी केले.आभार प्रा.सतिश कुदळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment