Tuesday 7 January 2020

तरूणांनी भाषिक कौशल्यातून रोजगारनिर्मिती करावीःप्रा.अनंता कस्तुरे

तरूणांनी भाषिक कौशल्यातून रोजगारनिर्मिती करावीःप्रा.अनंता कस्तुरे










 साताराः मराठी वाचन,लेखन,भाषण आदी भाषिक कौशल्यातून रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.महाविद्यालयीन तरूणांनी विविध भाषिक कौशल्ये विकसित करून रोजगारनिर्मिती करावी ,असे मत पाचगणी महेता काॅलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा.अनंता कस्तुरे यांनी व्यक्त केले.
   वाघोली ता.कोरेगाव येथील शंकरराव जगताप आर्टस् अॅण्ड काॅमर्स काॅलेजमध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत मराठी विभाग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आयोजित मराठी भाषा  संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या " भाषिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी " या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.आर.एम.पठाण होते.यावेळी मराठी विभागप्रमुख डाॅ.संजय साळुंखे,व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा.आर.व्ही.कारंडे,डाॅ.बिपीन वैराट,प्रा.शिवानी बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   प्रा.अनंता कस्तुरे म्हणाले,तरूणांना मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून अल्प भांडवलावर विविध अॅपच्याद्वारे रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.प्रत्येकांनी आवश्यक ते कोर्सेस व प्रशिक्षणे घेवून नोकरीस रोजगाराचा पर्याय निर्माण करावा.
   अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा.आर.एम.पठाण म्हणाले,आजच्या स्पर्धेत शासकीय नोकरी मिळेलच याची खात्री देता येत नाही हे वास्तव स्वीकारून तरूणांनी व्यवसायाचा पर्याय उपलब्ध करून ठेवला पाहिजे.प्रत्येकांनी विविध भाषिक व व्यावसायिक कौशल्ये शिकणे गरजेचे आहे.प्रास्ताविक प्रा.आर.व्ही.कारंडे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.आर.डी.टंकसाळे यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा.शिवानी बोबडे यांनी केले.आभार प्रा.डाॅ.जे.सी.सावंत यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment