Thursday 2 January 2020

युवकांनी वाहतुकीच्या नियमाबाबत समाजात जनजागृती करावीः सपोनि विकास बडवे

युवकांनी वाहतुकीच्या नियमाबाबत समाजात जनजागृती करावी: सपोनि विकास बडवे

 महेता काॅलेजमध्ये पोलीस स्थापना व ध्वज दिनानिमित्त प्रबोधन
 

















पाचगणी:समाजात वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे अपघात व अन्य घटनांना  सामोरे जावे लागत आहे.वाहतुकीच्या  नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे .युवकांनी वाहतुकीचे नियम पाळून तशी समाजात जनजागृती करावी असे प्रतिपादन पाचगणीचे सपोनि विकास बडवे यांनी व्यक्त केले.
    येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये राष्टीृय सेवा योजना विभाग व पाचगणी पोलीस ठाणे यांच्यावतीने महाराष्टृ पोलीस स्थापना दिन व ध्वज दिन यानिमित्ताने आयोजित 'वाहतुकीचे नियम व वाहन चालविण्याची दक्षता 'या विषयावरील प्रबोधनपर व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते. यावेळी सपोनि अरविंद माने,पोलीस काॅन्टेटेबल किर्तीकुमार कदम,पोलीस नाईक सूरज गवळे ,प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव,प्रा.अनंता कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,वाहतुकीचे नियमांबाबत समाजात युवकच चांगल्याप्रकारे जनजागृती करू शकतो.प्रत्येकांनी घरोघरी जावून वाहतुकीची नियमावली सांगून समाजाचे प्रबोधन करावे.
  सपोनि अरविंद माने म्हणाले,रस्त्यावरून येता जाताना जे फलक लावलेले आहेत .त्या फलकावरील नियमांचे प्रत्येकाने पालन करावे.नियम पाळले तरअपघात होणार नाहीत.पोलीस नाईक सूरज गवळे म्हणाले,वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागते.वाहतुकीचे नियम,नियमांचे तक्ते,बोर्ड याबाबत समाजात जागृती होणे आवश्यक आहे.
   प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.पाहुण्यांची ओळख प्रा.जयंत शिंदे यांनी करून दिली.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment