Monday 27 February 2023

प्रत्येकांनी मराठी भाषेची जपणूक करावीः सरोजकुमार मिठारी



प्रत्येकांनी मराठी भाषेची जपणूक करावीः सरोजकुमार मिठारी

पाचगणी :मराठी भाषा आपल्या सर्वांची सांस्कृतिक संचित असून तिची जपणूक करणे हे प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मराठी विश्वकोशाचे विद्याव्यासंगी संपादक, 'वळण'चे लेखक सरोजकुमार मिठारी यांनी केले.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील मीनलबेन महेता कॉलेजमध्ये आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्राचार्य डॉ. सतीश देसाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. सतीश कुदळे, मराठी विभागप्रमुख डॉ. अनंता कस्तुरे,प्रा.माणिक वांगीकर,हिंदी विभाग प्रमुख प्रा.नरेंद्र फडतरे, प्रा.शरद संघवी यांची प्रमुख उपस्थित होती.

मिठारी पुढे म्हणाले, विश्वकोश मराठीला ज्ञानभाषा बनविण्यासाठी मोठे काम करत असून विद्यार्थ्यांनी अभ्यासात विश्वकोशाचा अधिकाधिक वापर करावा.

यावेळी मायबोली भित्तिपत्रिका प्रकाशन, शुद्धलेखन स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात आले.प्रास्ताविक डाॅ. अनंता कस्तुरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले. आभार प्रा. नरेंद्र फडतरे यांनी मानले.
डाॅ.सुनिता गित्ते, डाॅ.अमृता कुलकर्णी, डाॅ.सुनील गुरव, ग्रंथपाल प्रा.राजेंद्र खंडाईत, प्रा. प्रशांत सुतार आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.