Friday 25 June 2021

प्रा.अनंता कस्तुरे यांना " मराठीच्या गुप्त बोली " संशोधनासाठी पीएच.डी पदवी प्रदान




प्रा.अनंता कस्तुरे यांना " मराठीच्या गुप्त बोली " संशोधनासाठी पीएच.डी.पदवी प्रदान

पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.अनंता कस्तुरे यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली.त्यांनी बोली भाषेचे अभ्यासक डाॅ.नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली " मराठी समूहाच्या गुप्त बोलींचा अभ्यास " या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले.
प्रा.अनंता कस्तुरे यांचे मराठीच्या गुप्त बोली याबाबतचे महत्वपूर्ण व गुप्त बोलींचा उलगडा करणारे असे संशोधन आहे.त्यांनी सदर संशोधन प्रबंधामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती,आदिवासी जमाती,विविध संप्रदाय,व्यावसायिक अशा अनेकविध मराठी समूहाच्या गुप्त बोलींचे समाजभाषावैज्ञानिक,समाजशास्रीय व तौलनिकदृष्टीने विश्लेषण केलेले आहे. मराठी समुहातील पारसी,चिडक,जंगली,डागुरी,छप्परबंद,बागवानी,बोटमोडी,करपल्लवी इ. 30 गुप्त बोलींची संपर्कप्रक्रिया व संप्रेषण व्यवहार,शब्दभांडार,वर्णमाला,व्याकरणविशेष,इतर भाषांचा प्रभाव ,गुप्त बोली निर्मितीप्रक्रिया,गुप्त बोलीचा इतिहास,हेतूआदीबाबतची मांडणी केलेली आहे. प्रा.अनंता कस्तुरे यांनी यापूर्वी M.A, B.Ed,NET,M.Phil,D.JC,L.TC अशा शैक्षणिक पदव्या प्राप्त केलेल्या आहेत.त्यांना एम.फिल संशोधनासाठी यापूर्वी कोलमहर्षी पुरस्कार,शोधनिबंधासाठी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे दोन उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार,कवितेसाठी प्रतिभासंगम ,देशभक्त बळवंतराव मगर प्रतिष्ठानचा विशेष गौरव पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रा.कस्तुरे यांनी दै.पुढारी,ललकार,जनप्रवास,अग्रदूत या दैनिकात बातमीदार व विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून काम केले आहे.त्यांचे 27 शोधनिंबध प्रसिध्द असून विविध वृत्तपत्रे,साप्ताहिक,मासिके आदीमध्ये कविता,कथा,पुस्तक परीक्षणे,लेख प्रसिध्द झाले आहेत.त्यांनी " गाथा स्वातंत्र्य लढ्याची कथा स्वातंत्र्यसैनिकांची " , " लक्ष्मीकांत देशमुख यांचे समग्र साहित्य " या पुस्तकांचे संपादन केले आहे.
प्रा.कस्तुरे यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केलेबद्दल श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,सचिव प्राचार्या सौ.शुभांगी गावडे,प्रशासन सहसचिव प्राचार्य डाॅ.युवराज भोसले, अर्थसहसचिव प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ,प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Friday 11 June 2021

महेता काॅलेजची कासवंड गावात कोरोनाविषयी जनजागृृृृृती

मास्कचा वापर,विलगीकरण कक्ष,कोरोनाविषयक पुस्तिका प्रकाशन व वाटप याद्वारे केली जनजागृृृृृृती







महेता काॅलेजची कासवंड गावात कोरोनाविषयी जनजागृती
पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या राष्टीृय सेवा योजना विभागाच्यावतीने कासवंड या गावात मास्कचा वापर,विलगीकरण कक्ष,कोरोना झालेनंतरची घ्यावयाची काळजी,कोरोनाविषयक पुस्तिका प्रकाशन व वाटप आदिविषयी जनजागृती केली.कासवंड गावचे सरपंच,उपसरपंचासह ग्रामस्थांचा या जनजागृतीस चांगला प्रतिसाद मिळाला.
पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या राष्टीृय सेवा योजना विभागाने गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कासवंड हे गाव पाच वर्षासाठी दत्तक घेतले आहे.काॅलेजच्यावतीने कासवंड गावात विविध शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक आदी उपक्रम राबविले जात आहेत.शासन व शिवाजी विद्यापीठाच्या माझा गाव कोरोना मुक्त गाव अभियानातंर्गत या गावात कोरोनाविषयक जनजागृती मोहिम राबविण्यात आली.
प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे यांनी कासवंड गावात जावून सरपंच जर्नाधन चोरमले,उपसरंपच लक्ष्मन पवार व मान्यवर ग्रामस्थांची भेट घेत मास्कचा वापर,विलगीकरण कक्ष,विद्यार्थ्यांचे करिअर ,काॅलेजमधील करिअर ओरिएंटेंड कोर्सेस आदीविषयी मार्गदर्शन केले. प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव,प्रा.संतोष निलाखे यांनीही सर्व ग्रामस्थांना काॅलेजचे उपक्रम,कोरोनाचे संकट व उपाययोजना याविषयी माहिती दिली. राष्टीृय सेवा योजना विभागाच्या सदस्या डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांच्या कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरची मार्गदर्शक तत्त्वे व आपत्तकालिन संपर्क माहिती पुस्तिका याचे प्रकाशन व वाटप प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे व सरपंच जर्नाधन चोरमले यांच्या हस्ते करण्यात आले. कासवंड ग्रामस्थांनी या पुस्तिकेतील संकलित माहिती व प्रकाशनाबद्दल डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांचे कौतुक केले. सदरचे उपक्रमावेळी प्रा.जयंत शिंदे,प्रा.सुनील नवघरे,प्रा.कृषिकेष कासुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सुनिल नवघरे यांनी केले.आभार प्रा.संतोष निलाखे यांनी मानले.

Wednesday 9 June 2021

बापूजींनी शिक्षणातून सुसंस्काराची पिढी घडविलीः प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर






बापूजींनी शिक्षणातून सुसंस्काराची पिढी घडविलीःप्राचार्य श्रीनिवास वाळवेकर 

 पाचगणीः शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणातून ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्काराची पिढी घडविली.बापूजींचे तत्वज्ञान तरूणांनी आत्मसात करून जीवनाला व करिअरला दिशा द्यावी,असे प्रतिपादन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी व्यक्त केले.

   पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज ,श्रीमती कांताबेन जे.पी.महेता ज्युनिअर काॅलेज व महात्मा फुले हायस्कूल या सर्व शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे शैक्षणिक संकूल पाचगणीच्यावतीने शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे होते.यावेळी प्रा.मानाजी शिंदे,प्रा.सतिश कुदळे.प्रा.संतोष निलाखे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     प्र.प्राचार्य प्रो.डाॅ किरण शिंदे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले,शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे या ज्ञानसूर्याने गावोगावी सर्वसामान्यांना शिक्षणरूपी प्रकाश दिला.यामुळेच गोरगरिब,दिनदलितांची मुले शिक्षण घेवू शकली.बापूजींचे ज्ञानदानाचे कार्य सर्वांना प्रेरणादायी असे आहे. 

      यानिमित्ताने सेवानिवृत्त झालेबद्दल प्रा.मानाजी शिंदे यांचा प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार तसेच स्वामी विवेकानंद व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.संतोष निलाखे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Monday 7 June 2021

छ.शिवाजी महाराजांनी बहुजनांसाठी शिवस्वराज्य निर्माण केलेःडाॅ.सुनिता गित्ते
















छ.शिवाजी महाराजांनी बहुजनांसाठी शिवस्वराज्य निर्माण केलेः डाॅ.सुनिता गित्ते

पाचगणीः मोघलकाळात सर्वसामान्य व बहुजन समाजावर विनाकारण अन्याय,अत्याचार होत होता.सर्व जनतेस आपले स्वराज्य हवे होते.म्हणूनच छ.शिवाजी महाराजांनी बहुजनांसाठी रयतेच्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. असे मत महेता काॅलेजच्या इतिहास विभागप्रमुख डाॅ.सुनिता गित्ते यांनी व्यक्त केले. पाचगणी येथील महेता काॅलेजमध्ये शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित "रयतेचे राज्य शिवस्वराज्य" या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रोफेसर डाॅ.किरण शिंदे होते.यावेळी प्रा.जयंत शिंदे,प्रा.संतोष निलाखे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थावरून बोलताना प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे म्हणाले,छ.शिवाजी महाराजांनी रयतेच्या मनातील बहुजनांचे राज्य निर्माण केले.महाराजांचे नेतृत्व,समता,परोपकार आदी गुण आदर्शवृत आहेत. यावेळी डाॅ.तुकाराम राबाडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.संतोष निलाखे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सुनील नवघरे यांनी केले.आभार डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.