Saturday 23 April 2022

पुस्तक वाचनामुळेच व्यक्तिमत्वाची जडणघडण होतेः प्रा.शितल पवार


      महेता काॅलेजमध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा
     व्याख्यान व पुस्तक प्रकट वाचन स्पर्धांचे आयोजन

























पाचगणीः प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत पुस्तकाचे वाचन महत्वाचे ठरीत असते.पुस्तक वाचनातूनच ज्ञान ,प्रगती व उंची प्राप्त होत असते.जीवनाला सर्वांगिण आकार देण्याचे काम पुस्तके करतात.यासाठी प्रत्येकांनी पुस्तक वाचनातून व्यक्तिमत्वाची जडणघडण करावी असे मत प्रा.शितल पवार यांनी व्यक्त केले.

येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्यावतीने जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला.यावेळी पुस्तक वाचनाचे महत्व या विषयावरील व्याख्यानात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.यावेळी ग्रंथालय विभागप्रमुख प्रा.राजेंद्र खंडाईत,मराठी विभागप्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,प्रा.माणिक वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले,जीवनात वाचनाला खूप महत्व आहे.वाचनामुळेच जगातील सर्व ज्ञान व माहिती प्राप्त होते.महात्मा गांधी,अरूदंती राॅय,डाॅ.अब्दुल कलाम,वि.स.खांडेकर,विश्र्वास नांगरे पाटील यांची पुस्तके प्रत्येकांनी वाचावित.पुस्तक वाचल्याशिवाय जगात काहीच मिळत नाही त्यामुळे युवकांनी काॅलेज जीवनातच विविध विषय व विविध साहित्य प्रकारची पुस्तके वाचावित.
  प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे व पुस्तकांचे पूजन करण्यात आले.यानिमित्ताने पुस्तक प्रकट वाचन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेचे उद् घाटन प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.परीक्षण इंग्रजी विभागप्रमुख प्रा.जयंत शिंदे,प्रा.नितीन वाघमारे यांनी केले.
   प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय  डाॅ.अनंता कस्तुरे यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार ग्रंथपाल प्रा.राजेंद्र खंडाईत यांनी मानले.कार्यक्रमास डाॅ.सलीम पठाण,प्रा.प्रशांत सुतार,डाॅ.अलीम जाफर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.