Friday 3 January 2020

युवतींनी शारीरिक व मानसिक आरोग्याची दक्षता घ्यावीः डाॅ.स्वाती देशपांडे

युवतींनी शारिरीक व मानसिक आरोग्याची दक्षता घ्यावीः डाॅ.स्वाती देशपांडे











पाचगणीः महाविद्यालयीन युवतींनी शारिरीक बरोबरच मानसिक आरोग्याची दक्षता घ्यावी.जीवनातील सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारीबाबत ज्येष्ठांचा व डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तशा उपाययोजना कराव्यात असे प्रतिपादन प्रसिध्द स्री रोग तज्ज्ञ डाॅ.स्वाती देशपांडे यांनी व्यक्त केले.
      येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये रोटरी कल्ब पाचगणी,महेता काॅलेजचा रोट्रॅक्ट क्लब व महिला सबलीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित आरोग्यविषयक व्याख्यान व  प्रशिक्षणामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते .यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि ,सचिव सुनील कांबळे,सदस्य अशोक पाटील,विनिता प्रसाद सक्सेना,महिला सबलीकरण विभागाच्या प्रमुख डाॅ.प्रियदर्शनी कांबळे,प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेवून तरुणींनी पुरोगामी विचार आत्मसात करून नवक्रांती घडवावी.प्रत्येकांनी स्वतः बरोबरच कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.रोटरीचे सचिव सुनील कांबळे म्हणाले,रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लब हे सातत्याने समाजउपयोगी व कल्याणकारी योजना राबवत असते.आरोग्यविषयक व्याख्यान व प्रशिक्षणातून युवतींमध्ये आरोग्यविषयक जनजागृती होईल.
   प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांनी करून दिला.प्रा.पूजा निकम यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट मनोगतातून व्यक्त केला.सूत्रसंचालन प्रा.रेश्मा देवरे यांनी केले.आभार प्रा.सारिका शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास  प्राध्यापिका व विद्यार्थींनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment