Wednesday 16 October 2019

NEWS : घरोघरी वाचन संस्कृती जपायला हवीःसुरेश देशपांडे



प्रमुख पाहुणे सुरेश देशपांडे मार्गदर्शन करताना



अध्यक्षीय भाषण प्राचार्य डाॅ.अरूण गाडे
पाहुण्यांचे स्वागत
प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांचे स्वागत
प्रास्ताविक - डाॅ.वामन सरगर
दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन
उपस्थित विद्यार्थी






घरोघरी वाचन संस्कृती जपायला हवीः सुरेश देशपांडे

पाचगणीः साहित्य हे समाजाला दिशा देण्याचे काम करते. साहित्य वाचनामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होतो.जीवनाला आकार देणारी वाचन संस्कृती घरोघरी जपायला हवी असे प्रतिपादन मराठी साहित्य परिषद डोंबवलीचे अध्यक्ष व प्रसिध्द साहित्यिक सुरेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
     पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभागाच्यावतीने  मराठी वाड्.मय मंडळ उद् घाटन व वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी डाॅ.वामन सरगर व प्रा.माणिक वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,महाविद्यालयीन काळात युवकांनी वाचन,लेखन,भाषण व संभाषण या कलांचा विकास करायला हवा.वाचनामुळे व्यक्तिमत्व व अभिरूची समृध्द होते त्यामुळे तरूणांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घ्यावा.
        या कार्यक्रमात सुरेश देशपांडे यांनी जप्ती ही विनोदी कथा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.प्रास्ताविक डाॅ.वामन सरगर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tuesday 15 October 2019

NEWS : बदलत्या पर्यावणाचा वन्यजीवांना धोका : प्राचार्य डाॅ.अरूण गाडे




..


बदलत्या पर्यावरणाचा वन्यजीवांना धोका : प्राचार्य डाॅ.अरूण गाडे

प्राणीशास्र विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताह साजरा

 पाचगणीः बदलत्या पर्यावरणाचा वन्यजीवांना धोका पोहचत आहे यामुळे वन्यजीवांची संख्या कमी होत आहे.बदलत्या वातावरणाचा विचार करून युवकांनी व सामाजिक संस्थांनी वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करून तशी समाजात जनजागृती करावी,असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी केले.
     पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील प्राणीशास्र विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजीत भित्तिपत्रिका अनावरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्राणीशास्र विभागप्रमुख प्रा.डाॅ.आर.एम.गणेशवाडे, डाॅ.गजानन सोनटक्के,डाॅ.बी.एन.कोकरे,डाॅ.मिलिंद सुतार,प्रा.सुनिल नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रा.डाॅ.आर.एम.गणेशवाडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.वर्षा घोरपडे यांनी केले.आभार प्रा.डाॅ.गजानन सोनटक्के यांनी मानले.संयोजन प्रा.स्मिता जगताप,प्रा.अश्विनी पवार,प्रा.शितल चव्हाण यांनी केले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Sunday 13 October 2019

NEWS :पाचगणीत काॅलेज कट्ट्यावर रंगला वाचन कट्टा

 






 पाचगणीत काॅलेज कट्ट्यावर रंगला वाचन कट्टा

          वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपक्रम,
           वाचन कट्ट्यावर वाचन,भाषण व                        कवितांचे सादरीकरण

पाचगणी: श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या ग्रंथालय विभागाने काॅलेज कट्ट्यावरच वाचन कट्ट्याचे आयोजन करीत वाचन प्रेरणा दिन वेगळ्या उपक्रमाने साजरा केला.या उपक्रमात काॅलेज कट्ट्यावरील विद्यार्थ्यांनी उत्सर्फूपणे सहभागी होत पुस्तक वाचन,भाषण,गीत व कवितांचे सादरीकरण केले.या उपक्रमांमुळे काॅलेज कट्टा वाचन कट्ट्यात चांगलाच रंगला.
     महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्यावतीने डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.यानिमित्ताने वाचन कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी प्रा.यू.बी.जाधव,ग्रंथपाल प्रा.राजेंद्र खंडाईत,प्रा.संतोष निलाखे,प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे,प्रा.नरेंद्र फडतरे,डाॅ.शहाजी जाधव,पंढरीनाथ भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   वाचन कट्ट्याचे उद् घाटनप्रंसगी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,ग्रंथालय विभागाचा वाचन कट्टा हा उपक्रम उल्लेखनिय व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तिमत्वाचा विकास करणारा आहे.विद्यार्थ्यांनी वाचन,लेखन,भाषण व संभाषण कौशल्याचा विकास करून विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करावे.
    वाचन कट्ट्यावर विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकातील उतारा व लेखांचे वाचन व मराठी व हिंदी गीतांचे व कवितांचे सादरीकरण केले.डाॅ.अब्दुल कलाम,वाचनाचे महत्व आदी विषयांवर भाषणही केले. 
     संयोजन प्रा.राजेंद्र खंडाईत,प्रा.संतोष निलाखे, प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे,पंढरीनाथ भिलारे यांनी केले.प्रास्ताविक किशोरी गोळे हिने केले.सूत्रसंचालन सरिता चोपडे हिने केले.आभार मयुरी मालुसरे हिने मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

NEWS : डाॅ.वामन सरगर यांचा Ph.D पदवी प्राप्त केलेबद्दल सत्कार







डाॅ.वामन सरगर यांचा पीएच.डी.पदवी प्राप्त केलेबद्दल सत्कार

 पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या मराठी विभागातील प्रा.डाॅ.वामन सरगर यांचा शिवाजी विद्यापीठाची मराठी विषयातील पीएच.डी पदवी प्राप्त केलेबद्दल प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
    डाॅ.वामन सरगर यांनी " मराठी काव्यनिर्मिती आणि 1990 नंतरच्या कवितेचे रूपविशेष " या विषयावरचा प्रबंध शिवाजी विद्यापीठाला सादर केला.त्यांना विद्यापीठातील मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ.नंदकुमार मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.डाॅ.वामन सरगर यांनी एम.ए,बी.एड,एम.फिल,सेट या पदव्या यापूर्वीच प्राप्त केल्या आहेत.त्यांचे 18  शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत.
    पाचगणीतील महेता काॅलेजमध्ये डाॅ.वामन सरगर यांचा पीएच.डी.पदवी प्राप्त केलेबद्दल प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.डाॅ.अरूण गाडे म्हणाले, डाॅ.सरगर यांनी केलेले मराठी कवितेतील संशोधन समाजाला व साहित्याला दिशा देणारे व समाजउपयोगी आहे.समीक्षक व वाचक त्यांच्या संशोधनाची नक्की दखल घेतील.नवोदित प्राध्यापकांनीही त्यांचा आदर्श घेवून आपापल्या विषयातील संशोधन करावे व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा.
   यावेळी डाॅ.बी.एम.कोकरे, डाॅ.जी.एस.बोत्रे,प्रा.जे.व्ही.शिंदे,प्रा.एस.पी.कुदळे,डाॅ.शहाजी जाधव,प्रा.अनंता कस्तुरे,प्रा.माणिक वांगीकर यांनी मनोगत व्यक्त करून डाॅ.सरगर यांना शुभेच्छा दिल्या.डाॅ.सरगर यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा.जे.व्ही.शिंदे यांनी केले.आभार प्रा.अनंता कस्तुरे यांनी आभार मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Saturday 5 October 2019

NEWS - कागदी आपट्याच्या पानांच्या भित्तिपत्रिकेतून केली पर्यावरणविषयक जनजागृृृृती


        






पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील वनस्पतीशास्र विभागाच्यावतीने जागतिक शिक्षक दिन व दसरा यानिमित्त " आला आला दसरा,आपट्याची पाने तोडायची आता विसरा " यासह पर्यावरण व स्री- भ्रूणहत्या विषयीच्या संदेशाची भित्तिपत्रिकेतून जनजागृती केली.प्राचार्य डाॅ.अरुण गाडे व वनस्पतीशास्र विभागप्रमुख डाॅ.बी.टी.दांगट यांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
     प्राचार्य डाॅ.अरुण गाडे म्हणाले,समाजात पर्यावरणपूरक दसरा साजरा करण्यासाठी वनस्पतीशास्र विभागाने भित्तिपत्रिकेतून केलेली जनजागृती प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.वृक्षसंवर्धन,स्री- भ्रूणहत्या,जलवर्धन,पर्यावरण संरक्षण आदीविषयी केलेले प्रबोधन पर्यावरण संरक्षणास उपयुक्त असे आहे.
  डाॅ.बी.टी.दांगट म्हणाले,युवकांनी पर्यावरणपूरक दसरा साजरा करून समाजात पर्यावरणविषयक जनजागृती करावी.भित्तिपत्रिकेतील आपट्याची पाने ही रद्दीच्या कागदापासून तयार केली आहेत.प्रत्येक पानावर मराठी,हिंदी,इंग्रजी व उर्दू भाषेत वृक्षसंवर्धन,बेटी बचाव,निसर्ग वाचवा असे पर्यावरण जागृतीचे संदेश दिले आहेत."आला आला दसरा,आपट्याची पाने तोडायची आता विसरा "अशी जागृती करत दसरा उत्सव साजरा करावा असे आवाहनही डाॅ.दांगट यांनी केले.
    भित्तिपत्रिकेचे संकलन वृशभ कदम,शुभम भिलारे,नितेश शिंदे,कृषिकेश सपकाळ यांनी केले.प्रास्ताविक डाॅ.बी.टी.दांगट यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांनी केले.आभार प्रा.स्नेहल गायकवाड यांनी मानले.संयोजन प्रा.मोहिनी माने व प्रा.उदय चौगुले यांनी केले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. 

NEWS - महेता काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांनी धरला गरबा नृृृृत्यावर ठेका







   

पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थींनी गरबा नृत्यावर ठेका धरला.मराठी व हिंदीतील गाण्यावर तरूणाई चांगलीच दंग झाली.गरबा नृत्यात   विद्यार्थ्यांनी उत्सर्फूत सहभाग घेतला.
     महेता काॅलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने  नवरात्र महोत्सवानिमित्त गरबा नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास प्राचार्य डाॅ.अरुण गाडे,प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे ,डाॅ.शहाजी जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गरबा कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
     गरबा नृत्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थींनी उत्सर्फूतपणे सहभाग घेतला.मराठी व हिंदीतील विविध गाण्यावर तरुणांईने मनापासून सहभागी होत गरबा नृत्य केले.गाण्यांची चाल ,सूर व संगितावर विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी चांगलाच ठेका धरला.दोन तास तरुणाई गरबा नृत्यावर दंग झाली होती.
   प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांनी केले.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले.

Wednesday 2 October 2019

महेता काॅलेजमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त " माझे महाविद्यालय स्वच्छ महाविद्यालय "उपक्रम


















पाचगणीः महेता काॅलेजमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त " माझे महाविद्यालय स्वच्छ महाविद्यालय " उपक्रम राबविण्यात आला.प्राचार्य डाॅ.अरूण गाडे,प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेची शपथ घेतली.
     महाविद्यालयातील राष्टीृय सेवा योजना विभागाच्यावतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.प्रांरभी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत प्राचार्य डाॅ.अरूण गाडे,प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.महाविद्यालय परिसरातील केरकचरा,गवत तसेच शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली.यावेळी माझे महाविद्यालय,माझा परिसर स्वच्छ ठेवण्याची सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
   प्राचार्य डाॅ.अरुण गाडे म्हणाले,महात्मा गांधीजीचे सत्य,अहिंसा,माणुसकी आदी विचार प्रेरणादायी आहेत.जगाने त्यांचे तत्वज्ञान स्विकारले आहे.तरूणांनी गांधीजींचे विचार आत्मसात करून तसे जीवन जगले पाहिजे.गांधीजीकडून समाजाचा विकास करण्याचा वसा व वारसा घेतला पाहिजे.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले.