Friday 3 January 2020

महेता काॅलेजमध्ये "भारतीय महिला शास्रज्ञ" भित्तिपत्रिकेचे प्रकाशन

महेता काॅलेजमध्ये "भारतीय महिला वनस्पतीशास्रज्ञ "भित्तिपत्रिकेचे प्रकाशन
  



पाचगणीःयेथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील वनस्पतीशास्र विभागाच्यावतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त " भारतीय महिला वनस्पतीशास्रज्ञ" या विषयाच्या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेवून मुलींनी नवनवीन श्रेत्रात नावलौकीक मिळवावा.सावित्रीबाई फुले यांचे पुरोगामी विचार आत्मसात करून आवडत्या क्षेत्रात नवक्रांती घडवावी.
   प्रास्ताविकात वनस्पतीशास्र विभागप्रमुख डाॅ.भाऊराव दांगट म्हणाले,  भित्तिपत्रिकेत जानकी अम्मल,  अर्चना शर्मा,प्रिया दावीदार,शिप्रा मुखर्जी,विद्यावती या महिला शास्रज्ञांची माहिती संकलित करण्यातआली आहे.यानिमित्ताने सावित्रीच्या लेकींच्या कार्याचा गौरव केला आहे.तरूणींनी या कार्याचा आदर्श घेवून करिअर घडवावे.आभार डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment