Thursday 8 April 2021

मराठी विभागाची आठ पुरस्कार प्राप्त विद्यार्थीनी सौ.स्वाती राजगुरू हिचा सत्कार


     पुरस्कार प्राप्त सौ.स्वाती राजगुरू हिचा सत्कार              करताना प्राचार्य डाॅ.किरण शिंदे

पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील मराठी विभागाची माजी विद्यार्थींनी सौ.स्वाती राजगुरू हिला शिवाजी विद्यापीठ एम.ए.मराठी विषयासाठी विद्यापीठाचे विविध आठ पुरस्कार प्राप्त झाले.याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने सौ.स्वाती राजगुरू हिचा प्राचार्य डाॅ.किरण शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विविध पुरस्कार प्राप्त झालेबद्दल सौ.स्वाती राजगुरू हिचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
                   श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभागाच्यावतीने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डाॅ.किरण शिंदे होते.यावेळी डाॅ.बी.एन.कोकरे, संतोष कवी,प्रकाश गोळे,मराठी विभागप्रमुख प्रा.अनंता कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.सौ.राजगुरू हिला कवी माधव ज्युलीयन,कथाकार चारूता सागर,प्रो.गो.मा.पवार पुरस्कार असे आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.                           
       प्राचार्य डाॅ.किरण शिंदे म्हणाले,यश प्राप्त करण्यासाठी व गुणवंत होण्यासाठी कष्ट व जिद्दी स्वभाव असणे आवश्यक आहे.शिवाजी विद्यापीठाचे एकावेळी आठ पुरस्कार मिळवून मराठी विषयात सौ.स्वाती राजगुरू हिने यशाचे शिखर गाठले आहे.तिचा आदर्श घेवून सर्वांनी मार्गक्रमण केले पाहिजे.तिच्या यशामुळे महेता काॅलेजच्या वैभव,यश व गुणवत्तेत भर पडली आहे. सौ.स्वाती राजगुरू हिने मनोगतात काॅलेज,प्राध्यापक ,कुंटुबिय व समाजाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार डाॅ.वामन सरगर यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Monday 5 April 2021

शिवाजी विद्यापीठ आठ पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थींनी सौ.स्वाती राजगुरू सत्कार समारंभ











श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील मराठी विभागाची माजी विद्यार्थीनी सौ.स्वाती राजगुरू हिने एम. ए. (मराठी )मध्ये गुणवंत यादीत प्रथम येत शिवाजी विद्यापीठाचे आठ पुरस्कार प्राप्त केले. याबद्दल महाविद्यालयात मा. प्राचार्य डॉ.किरण शिंदे ,डाॅ.बी.एन.कोकरे,मा.संतोष कवी,मा.प्रकाश गोळे या मान्यवरांच्या हस्ते सौ.स्वाती राजगुरू हिचा सत्कार करण्यात आला.तसेच नुतन प्र.प्राचार्य डाॅ.किरण शिंदे यांचा पाचगणी ग्रामस्थांच्यावतीने मा.प्रकाश गोळे व मा.संतोष कवी यांनी सत्कार केला.याचबरोबर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गिरिस्थान या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी प्राचार्य डाॅ.किरण शिंदे,सौ.स्वाती राजगुरू व संतोष कवी यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले आभार डाॅ.वामन सरगर यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.











महेता काॅलेजमध्ये " गिरिस्थान" नियतकालिकाचे प्रकाशन



महेता काॅलेजमध्ये गिरिस्थान नियतकालिकाचे प्रकाशन करताना प्राचार्य डाॅ.किरण शिंदे,डाॅ.बी.एन.कोकरे,संतोष कवी,प्रकाश गोळे,संपादक प्रा.अनंता कस्तुरे व संपादक मंडळ                

  पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या " गिरिस्थान " या नियतकालिकाचे प्रकाशन प्र.प्राचार्य डाॅ.किरण  शिंदे,डाॅ.बी.एन.कोकरे,मा.प्रकाश गोळे,संतोष कवी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.गिरिस्थान नियतकालिकात महाविद्यालयातील नवोदित विद्यार्थी लेखकांचे लेख,कथा,कविता,समीक्षण आदी लेखन साहित्य प्रसिध्द केले आहे.   
     महाविद्यालयात गिरिस्थान नियतकालिक संपादक समितीच्यावतीने या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे मा.प्रकाश गोळे व मा.संतोष कवी होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डाॅ.किरण शिंदे होते.यावेळी डाॅ.बी.एन.कोकरे ,गिरिस्थानचे प्रमुख संपादक प्रा.अनंता कस्तुरे ,(मराठी विभाग)इंग्रजी विभागाचे सहसंपादक प्रा.जयंत शिंदे,हिंदी विभागाचे सहसंपादक प्रा.नरेंद्र फडतरे,विज्ञान विभागाचे सहसंपादक डाॅ.बी.टी.दांगट,फोटो विभागाचे सहसंपादक प्रा.संतोष निलाखे,जाहिरात विभागाचे प्रा.दत्तात्रय मोहिते,अहवाल विभागाचे सहसंपादक प्रा.शरद संघवी यांची प्रमुख उपस्थिती होती.    
       प्राचार्य डाॅ.किरण शिंदे म्हणाले,गिरिस्थान नियतकालिकातून विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला योग्य संधी मिळाली.नवोदित लेखक घडविण्यात महाविद्यालयीन नियतकालिकाचा महत्वाचा वाटा आहे.   प्रास्ताविक प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.नरेंद्र फडतरे यांनी केले.आभार प्रा.जयंत शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Thursday 1 April 2021

महेता काॅलेजच्या प्र.प्राचार्यपदी प्रो.डाॅ.किरण शिंदे यांची नियुक्ती


मनोगत व्यक्त करताना प्र.प्राचार्य डाॅ.किरण शिंदे


शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे बाजूस डाॅ.बी.एन.शिंदे


मनोगत व्यक्त करताना डाॅ.बी.एन.कोकरे




महेता काॅलेजच्या प्र.प्राचार्यपदी प्रो.डाॅ.किरण शिंदे यांची नियुक्ती     
 
    पाचगणीः येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या प्र.प्राचार्यपदी प्रो.डाॅ.किरण शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.यानिमित्ताने महाविद्यालयात डाॅ.शिंदे यांचे डाॅ.बी.एन.कोकरे यांच्या हस्ते पदभार देवून स्वागत करण्यात आले.

          पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये नुतन प्र.प्राचार्य म्हणून प्रो.डाॅ.किरण शिंदे रूजू झाले आहेत.डाॅ.शिंदे हे विवेकानंद काॅलेजमध्ये प्राणीशास्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत  होते.त्यांनी तासगाव,मिरज,सातारा,लोणी काळभोर आदी ठिकाणी प्राध्यापक म्हणून सेवा केली आहे.संधोधक व लेखक म्हणूनही ते सर्वत्र परिचित आहेत.पदभार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रो.डाॅ.किरण शिंदे म्हणाले,शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या विचारांचा जागर आणि त्यांनी सुरू केलेली ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्यासाठीचे कार्य करण्यासाठी मी आलो आहे.सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांचा व काॅलेजचा  सर्वांगिण विकास करूया. यावेळी डाॅ.बी.एन.कोकरे व डाॅ.मिलींद सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा.जयंत शिंदे यांनी केले.आभार प्रा.संतोष निलाखे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.