Friday 27 September 2019

NEWS - महेता काॅलेजमध्ये मतदार जनजागृृृृती अभियान व EVM मशिन प्रशिक्षण शिबीर संपन्न


 















पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज व तहसील  महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने महेता काॅलेजमध्ये मतदार जनजागृती अभियान व EVM व VV PAT मशिन प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.पाचगणी नगरपालिकेचे बी.एल.ओ.कालिदास शेंडगे व पाचगणीचे तलाठी प्रशांत इंगवले यांनी हे प्रशिक्षण दिले.कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरुण गाडे होते.

      महेता काॅलेजमध्ये राष्टीृृृय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित मतदार जनजागृती अभियान व EVM मशिन प्रशिक्षणास प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला. प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,भारतात लोकशाहीला अतिशय महत्व आहे.युवकांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करावे युवकांनी मतदान व EVM मशिनबाबत समाजात जनजागृती करावी.मतदानाचे कर्तव्य पार पाडावे.
     मतदान प्रशिक्षण व EVM मशिन जनजागृती अभियानात पाचगणी नगरपालिकेचे बी.एल.ओ.कालिदास शेंडगे,तलाठी प्रशांत इंगवले,पिंकेश सपकाळ,बी.ऐल.ओ.आनंद कांबळे,आल्पाक पठाण,प्रकाश हिरवे,सूर्यकांत कासुर्डे,संतोष सावंत,प्रकाश हिरवे,अजित बगाडे!श्री.कापसे यांनी सहभाग घेत प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मतदान व EVM मशिनबाबत प्रशिक्षण दिले.तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदानाच्या प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला व मतदानाची प्रक्रिया समजावून घेतली.

     प्रास्ताविक प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार डाॅ. शहाजी जाधव यांनी मानले.यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tuesday 24 September 2019

महाविद्यालयीन युवक व सामाजिक बांधिलकी भित्तिपत्रिकेचे प्रकाशन

 महेता काॅलेजमध्ये राष्टीृृय सेवा योजना दिन साजरा









महाविद्यालयीन युवक व सामाजिक बांधिलकी भित्तिपत्रिकेचे प्रकाशन

 पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये राष्टीृय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालयीन युवक व सामाजिक बांधिलकी या विषयावरील भित्तिपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.या भित्तिपत्रिकेत राष्टीृय सेवा योजना,सामाजिक बांधिलकी,युवकांची कर्तव्ये आदी विषयीच्या माहितीचे संकलन केले आहे.

    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,महाविद्यालयीन युवकांच्यात सामाजिक बांधिलकी,देशप्रेम,श्रमप्रतिष्ठा ,आदर आदी मूल्यांची पेरणी राष्टीृय सेवा योजनेतून होत असते.युवकांच्या सर्वांगिण विकासाबरोबर चांगला माणूस म्हणून जगण्याची जाणीवही या योजनेमुळे होते.सामाजिक जाणिव निर्माण करण्यासाठी ही भित्तिपत्रिका उपयुक्त आहे.

  राष्टीृय सेवा योजना विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रास्ताविक प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,राष्टीृय सेवा योजनेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Monday 23 September 2019

प्राध्यापकांनी समाजातील बदलत्या लोकसाहित्याचा शोध घ्यावाः डाॅ.शहाजी जाधव






  प्राध्यापकांनी समाजातील बदलत्या लोकसाहित्याचा शोध घ्यावा :डाॅ.शहाजी जाधव

  पाचगणी : समाजात काळानुरूप साहित्य,तंत्रज्ञान,सांस्कृतिक आदी क्षेत्रात बदल होत आहेत.लोकसाहित्यातही अनेक प्रकारचे नवीन संदर्भ पहावयास मिळतात.प्राध्यापक व संशोधकांनी समाजातील बदलत्या लोकसाहित्याचा शोध घ्यावा आणि ते साहित्य पुस्तकरूपाने वाचकांसमोर आणावे  ,असे मत हिंदी विभागाचे डाॅ.शहाजी जाधव यांनी व्यक्त केले.

       पाचगणी येथील मीनलबेन महेता काॅलेजमध्ये प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद् घाटनप्रसंगी लोकसाहित्य का जनमानस पर प्रभाव या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले , प्राध्यापक प्रबोधनीच्या माध्यमातून प्राध्यापकांनी नवनवीन विषय व संशोधन यावर प्रबोधन करावे.विविध विषयातील ज्ञान संपादनाच्या दृष्टीृने प्रबोधिनीतील व्याख्याने मार्गदर्शक ठरतात.प्रत्येकांनी आवडत्या विषयाची मांडणी करून  आपले ज्ञान सर्वांपर्यत पोहचवावे.

       प्रास्ताविक प्रा.संतोष निलाखे यांनी केले.आभार प्रा.सतिश कुदळे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

Friday 20 September 2019

पाचगणीतील महेता काॅलेजमध्ये हिंदी दिन साजरा

 

हिंदी भाषेत व्यक्तिमत्वाच्या सर्वांगिण विकासाची क्षमता :डाॅ.जीतेन्र्द पांडेय

  पाचगणी : हिंदी ही देशातील महत्त्वपूर्ण भाषा असून या भाषेत व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास करण्याची क्षमता आहे.विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत ज्ञान संपादन करून साहित्य,स्पर्धा परीक्षा आदी क्षेत्रात करियर घडवावे ,असे मत सेंट पीटर्स कनिष्ठ काॅलेजचे हिंदी विभाग प्रमुख डाॅ.जीतेन्र्द पांडेय यांनी व्यक्त केले.

       पाचगणी येथील मीनलबेन महेता काॅलेजमध्ये हिंदी विभागाच्यावतीने आयोजित हिंदी दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी हिंदी विभागप्रमुख प्रा,नरेंद्र फडतरे, डाॅ.शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले ,विद्यार्थ्यांनी  काॅलेज जीवनातच मराठी,इंग्रजी,हिंदी भाषेचे ज्ञान आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास करावा.हिंदी भाषेत साहित्य,प्रसारमाध्यमे,शासकीय सेवा आदी क्षेत्रात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करून करिअर घडवावे.

प्रारंभी डाॅ.जीतेन्र्द पांडेय व प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते शब्दशिल्प या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन अनुज जगताप यांनी केले.आभार हिंदी विभाग प्रमुख नरेंद्र फडतरे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

Saturday 14 September 2019

महाविद्यालयीन तरूण - तरूणींनी महिलांचा लैंगिक छळ कायद्याबाबत समाजात जनजागृृृती करावी:अॅड.रसिद सूर्यवंशी

     







 महाविद्यालयीन तरूण - तरूणींनी महिलांचा लैंगिक छळ कायद्याबाबत समाजात जनजागृती करावी: अॅड रसिक सूर्यवंशी

  पाचगणी : समाजात नोकरीच्या ,कामाच्या ठिकाणी महिलांवरील अत्याचार,लैगिंग शोषन वाढलेआहे.नोकरदार महिलांनी संघटीत होवून होत असलेल्या अन्यायाबाबत आवाज उठवावा व संबधितास कायद्याने धडा शिकवावा.महाविद्यालयीन युवतींनीही मी टू मोहिम व महिलाचा लैंगिक छळ  कायद्याबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे मत अॅड.रसिक सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

       पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये इतिहास विभाग व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्यावतीने "कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम -2013 " या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी इतिहास विभागप्रमुख डाॅ.सुनिता गित्ते,प्रा.रेश्मा देवरे ,प्रा.सारिका शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले , समाजात महिलांवरील अन्याय अत्याचारात  वाढ होत आहे.महिलांनी आपल्यावरील अन्याय,अत्याचाराची पोलीसात रितसर तक्रार देवून आरोपींना शिक्षा करावी.महाविद्यालयीन युवतींनी महिला संरक्षण व कायद्याविषयक  चळवळीत सहभागी होवून समाजात जनजागृती करावी.
   
प्रारंभी अॅड रसिक सुर्यवंशी व प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन  करण्यात आले.प्रास्ताविक  इतिहास विभागप्रमुख डाॅ.सुनिता गित्ते यांनी केले.आभार प्रा.सारिका शिंदे यांनी मानले.सुत्रसंचालन प्रा.रेश्मा देवरे यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

हिमोग्लोबिन व आरोग्य शिबीर


Wednesday 11 September 2019

शिवाजी विद्यापीठ क्राॅस कंट्री स्पर्धा










शिवाजी विद्यापीठ क्राॅस कंट्री स्पर्धेत वारणानगर व नेसरी महाविद्यालयांना विजेतेपद

मुलांमध्ये रिलेश मांगले (सांगलीवाडी) तर मुलींमध्ये रेश्मा केवते (कोरेगाव ) प्रथम क्रमांकाचे मानकरी

पाचगणी : श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजने पाचगणीत आयोजित केलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविद्यापीठ क्राॅस कंट्री स्पर्धा उत्साहात पार पडल्या.महाविद्यालयीन सांघीक स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, वारणानगर तर मुलींच्या गटात टी.के.कोळेकर काॅलेज,नेसरी या महाविद्यालयांनी विजेतेपद मिळविले.वैयक्तिक स्पर्धेत मुलांच्या गटात रिलेश संध्यानंद मांगले( डाॅ.पी.के.काॅलेज,सांगलीवाडी) याने तर मुलींच्या गटात रेश्मा दत्तू केवते( डी.पी.भोसले काॅलेज,कोरेगाव )हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.विजेत्या स्पर्धकांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
     स्पर्धेतील विजेत्यांना पाचगणीचे सपोनि विकास बडवे,शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ.पी.टी.गायकवाड,प्राचार्य डाॅ.अरूण गाडे,प्रा.आर.टी.पाटील,स्पर्धा संयोजक प्रा.दत्तात्रय मोहिते यांच्या हस्ते ट्राॅफी देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी डाॅ.आय.एच.मुल्ला,प्रा.ए.यू.माने,डाॅ.विकास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.          स्पर्धेतील विजेते अनुक्रमे याप्रमाणे वैयक्तिक मुलांचा गट - रिलेश संध्यानंद मांगले (डाॅ.पी.के.काॅलेज,सांगलीवाडी)हर्षवर्धन संतोष दबाडे, (एल.बी.एस.काॅलेज,सातारा)प्रतिक शिवाजी उंबरकर, (किसन वीर काॅलेज,वाई)किरण कृष्णात दिंडे, (वाय.सी.डब्लू काॅलेज,वारणानगर)वैभव एकनाथ पाटील,(ए.सी,एस.काॅलेज,गडहिंग्लज)महेश संजय खामकर(नाइट काॅलेज,कोल्हापूर)मुलींचा गटातील विजेते अनुक्रमे याप्रमाणे रेश्मा दत्तू केवते, (डी.पी.भोसले काॅलेज,कोरेगाव)सायली सुनिल कोकीटकर ,(शिवराज काॅलेज,गडहिंग्लज)वैशाली विलासराव सावंत ,(दहिवडी काॅलेज)प्रतिक्षा किरण पाटील ,(नेसरी)संजीवनी श्रीकांत दिंडे, (नेसरी)स्नेहल नामदेव हिरवे (किसन वीर काॅलेज,वाई)    सांघिक स्पर्धेतील विजेते याप्रमाणे मुलांचा गट -प्रथम -वाय.सी.काॅलेज,वारणानगर,द्वितीय - जयसिंगपूर काॅलेज,तृतीय - ए.सी.एस.काॅलेज,गडहिंग्लज मुलींचा गट प्रथम - टी.के.काॅलेज,नेसरी,द्वितीय - शिवराज काॅलेज,गडहिंग्लज,तृतीय - किसन वीर ,वाई पंच म्हणून डाॅ.गणेश सिंहासन,प्रा.एन.डी.बनसोडे,प्रा.प्रविण नांदगावे,प्रा.राहूल मगदूम,प्रा.कांचन बेल्लाद यांनी काम पाहिले.