Friday 17 January 2020

प्राध्यापकांनी समाजात संस्काराची पेरणी करून समाजपरिवर्तन घडवावेः प्रा.अनंता कस्तुरे










प्राध्यापकांनी समाजात संस्काराची पेरणी करून समाजपरिवर्तन घडवावे :प्रा.अनंता कस्तुरे

महेता काॅलेजमध्ये "ज्ञानशिदोरी दिन "साजरा 

पाचगणीः श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्यअभयकुमार साळुंखे यांनी शैक्षणिक,सामाजिकआदी कार्यातून समाजात मूल्ये व संस्काराची रूजवणूक केली.हाच वसा व वारसा जपत त्यांचा वाढदिवस  " ज्ञानशिदोरी दिन " म्हणून साजरा करताना प्राध्यापकांनी समाजात संस्काराची पेरणी करून समाजपरिवर्तन घडवावे,असे मत मराठी विभागप्रमुख प्रा.अनंता कस्तुरे यांनी व्यक्त केले.
    पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस " ज्ञानशिदोरी दिन " म्हणून साजरा करण्यात आला यानिमित्ताने आयोजित  " ज्ञानशिदोरीकार प्राचार्य अभयकुमार साळुंखे " या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी डाॅ.गोपीनाथ बोत्रे होते.यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ.शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
  डाॅ.गोपीनाथ बोत्रे म्हणाले,प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य  सर्वांना आदर्शवत व प्रेरणादायी आहे.ज्ञानशिदोरी दिनाच्यानिमित्ताने प्रत्येकांनी समाजात ज्ञान,पुस्तके व चांगल्या सवयी याची जनजागृती करावी.यावेळी प्रा.सतिश कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.आभार प्रा.नितीन वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

फोटोओळीः महेता काॅलेजमध्ये ज्ञानशिदोरी दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा.अनंता कस्तुरे बाजूस डाॅ.गोपीनाथ बोत्रे,डाॅ शहाजी जाधव आदी

No comments:

Post a Comment