Wednesday 29 January 2020

श्रमसंस्कार शिबीरात कागद व कापडांच्या हस्तकलांचे सादरीकरण










श्रमसंस्कार शिबीरात कागद व कापडांच्या हस्तकलांचे सादरीकरण
 
पाचगणीःश्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या राष्टीृय सेवा योजना विभागाच्या   विशेष श्रमसंस्कार शिबीरात महात्मा गांधी टेृनिंग सेंटरचे गोपाल लाल राजपूत यांनी कागद व कपड्यापासूनच्या हस्तकलांचे सादरीकरण केले.या हस्तकला सादरीकरणास विद्यार्थ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
    रूईघर येथील विशेष श्रमसंस्कार शिबीरात गोपाल लाल राजपूत यांनी हस्तकलांचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.बाहुली,आकाशकंदील व विविध नक्षीकामांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.अध्यक्षस्थानी डाॅ.मिलींद सुतार होते.यावेळी प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव,प्रा.अनंता कस्तुरे,प्रा.सुनील नवघरे,डाॅ.सलीम पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक प्रा.सुनील नवघरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार डाॅ.सलीम पठाण यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते.

Sunday 26 January 2020

पाचगणीत विद्यार्थ्यांनी रॅलीतून केली मतदान व पर्यावरणविषयक जनजागृती








पाचगणीत विद्यार्थ्यांनी रॅलीतून केली मतदान व पर्यावरणविषयक जनजागृती

 पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील राष्टीृय सेवा योजना,राज्यशास्र विभाग व भूगोल विभागाच्यावतीने प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पाचगणी शहरातून मतदान,संविधान व पर्यावरणविषयक जनजागृती केली.या रॅलीत विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीविषयक घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले.
   महेता काॅलेजमध्ये राष्टीृय मतदान दिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित जनजागृती रॅलीमध्ये प्राचार्य डाॅ.अरूण गाडे,प्रा.यु.बी.जाधव,डाॅ.सलीम पठाण,प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव,प्रा.अनंता कस्तुरे यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी रॅलीत तुमचे मत तुमचा अधिकार,संविधान वाचवा देश वाचवा,वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे व प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा अशा घोषणा दिल्या.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.आभार डाॅ.सलीम पठाण यांनी मानले.

Friday 24 January 2020

श्रमसंस्कार शिबीरे व्यक्तिमत्वाला आकार देतातःसुनील कांबळे

















श्रमसंस्कार शिबीरे व्यक्तिमत्वाला आकार देतातः सुनील कांबळे

 पाचगणीः तरूणांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी राष्टीृय सेवा योजना विभागाची विशेष श्रमसंस्कार शिबीरे उपयुक्त ठरतात.विद्यार्थ्यांनी या शिबीराच्या माध्यमातून सामाजिक सेवेची बांधिलकी जपावी,असे प्रतिपादन रोटरी क्लब आॅफ पाचगणीचे सचिव सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.
   रूईघर ता.जावली येथे श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या राष्टीृय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या उद् घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी ग्रामपरीच्या संचालिका जयश्री राव ,उपसरपंच सौ.सुनंदा बेलोसे,मुख्याध्यापिका सौ.शशिकला शिंदे,पोलीस पाटील प्रवीण पवार,प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव,प्रा.अनंता कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,युवा शक्तीच देशाला बलशाही बनवू शकते.श्रमसंस्कार शिबीरातून विद्यार्थ्यांच्यावर श्रमसंस्काराबरोबरच नितीमूल्यांचे शिक्षण द्यावे.
  यावेळी उपसरपंच सुनंदा बेलोसे,मुख्याध्यापिका शशिकला शिंदे,डाॅ.गोपीनाथ बोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रा.रेश्मा देवरे यांनी केले.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटोओळीः महेता काॅलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरात बोलताना सुनील कांबळे बाजूस प्राचार्य डाॅ.अरूण गाडे आदी

युवकांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करावीःडाॅ.अनिलकुमार वावरे






युवकांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करावीः डाॅ.अनिलकुमार वावरे

 पाचगणीः जागतिक स्पर्धेत भारतीय अर्थव्यवस्था कुमकुवत होत चालली आहे.यामुळेच भारत देश अविकसीत देशांच्या यादीत समाविष्ठ झाला आहे.भारताला आर्थिकदृष्टीने मजबूत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,असे मत शिवाजी विद्यापीठ अर्थशास्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डाॅ.अनिलकुमार वावरे यांनी व्यक्त केले.
   पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये अर्थशास्र विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठ अग्रणी काॅलेज योजना अंतर्गत " भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने " या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी किसनवीर काॅलेजचे अग्रणी काॅलेजचे  प्रमुख डाॅ.संजय धोंडे,प्रा.गावित,अर्थशास्र विभागप्रमुख प्रा.सतिश कुदळे,डाॅ.तुकाराम राबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,युवकांनी उद्योग,शेती आदी क्षेत्रात करिअर करावे.भारतीय अर्थव्यवस्थेला तरूणच मजबूत बनवतील.
   प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते "नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांचे आर्थिक विचार " या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक डाॅ.तुकाराम राबाडे यांनी केले.डाॅ.संजय धोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रा.रेश्मा देवरे यांनी केले.आभार प्रा.सतिश कुदळे यांनी मानले.

Monday 20 January 2020

पाचगणीच्या पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार,दि.22 रोजी बैठकीचेआयोजन





पाचगणीच्या पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार,दि.22 रोजी बैठकीचे आयोजन


पाचगणी -:  पाचगणीच्या पर्यावरण संवर्धनासाठी पाचगणी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे.वेळोवेळी लागणार्‍या वणव्याचे सत्र शमविण्यासाठी रोटरीने बुधवार दि. २२ रोजी सांयकाळी 7 वाजता पाचगणी परिसरातील प्रत्येक गावतील पोलीस पाटील, निसर्ग प्रेमी व सरपंचांची बैठक आयोजित केली आहे.या बैठकीत वणव्याबाबतचे कायदे,उपाययोजना आदीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन गुरेघर ( ता महाबळेश्वर ) येथील वनपरिमंडळ अधिकारी  सुनील लांडगे व रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि यांनी केले आहे.
  पाचगणी परिसरातील डोंगररांगेत , रानावनात  अनेकवेळा वणवा लागतो त्यामुळे निसर्गाची ऱ्हास  होते त्याचबरोबरबच पक्षी व जमिनीवर वावणारे, सरपटणारे प्राणी होरपळून जातात . शासनाच्या वतीने दरवर्षी  या बाबत उपाय योजना केल्या जातात मात्र वनव्यांचे सत्र सुरूच असते . वणव्या बाबत  जनजागृती मोहीम अधिक गतिमान व्हावी या हेतूने रोटरी क्लबने स्थानिक युवा मंडळे , निसर्ग प्रेमी आदींची बैठकआयोजित केल्याचे रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि यांनी सांगितले . रोटरी क्लबने आयोजित केलेल्या बैठकीस  मालकी पांचगणी क्लब येथे बुधवारी सायंकाळी ७.०० वाजता निसर्गप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरीचे सचिव सुनील कांबळे यांनी केले आहे .

Saturday 18 January 2020

महेता काॅलेजचे रूईघर येथे दि.24 पासून विशेष श्रमसंस्कार शिबीर







महेता काॅलेजचे रूईघर येथे दि.24 जानेवारीपासून विशेष श्रमसंस्कार शिबीर
 
पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील राष्टीृय सेवा योजना विभागाचे शिवाजी विद्यापीठाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर रूईघर ता.जावली येथे दि.24 ते 30 जानेवारी दरम्यान आयोजित केले आहे.या शिबीरात व्याख्याने,वैद्यकिय शिबीर,वृक्षारोपन,वणवा बंदी प्रबोधन,जलसंवर्धन आदी उपच्रमाचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्य डाॅ.अरूण गाडे व प्रकल्पाधिकारी डाॅ शहाजी जाधव यांनी दिली.
     प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,सदर शिबीराचे उद् घाटन प्रसिध्द उद्योजक मयूरजी व्होरा ,रोटरी क्लबचे सचिव सुनील कांबळे,जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी रूईघरच्या उपसरपंच सौ.सुनंदा बेलोशे,मुख्याध्यापक सौ.शशिकला शिंदे!ग्रामसेवक दुर्योधन शेलार,तंटामुक्तीचे अध्यक्ष अकुंश बेलोशे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.समारोप दि.30 जानेवारी रोजी होणार आहे.समारोपाचे प्रमुख पाहुणे श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ आहेत.यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे,मुख्याध्यापक सुर्यकांत देसाई उपस्थित राहणार आहेत.
     डाॅ.शहाजी जाधव म्हणाले,दि.25 रोजी सायंकाळी 4 वाजता डाॅ.दत्तात्रय कोरडे यांचे स्वराज्यमाता जिजाऊ या विषयावर व्याख्यान होणार आहे.दि.26 रोजी प्रा.विलास खंडाईत हे अंधश्रध्दा निर्मूलन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.दि.27 रोजी डाॅ.सलीम पठाण यांचे भारतीय राज्यघटना आणि धर्मनिरपेक्ष भारतीय राष्टृवाद या विषयावर व्याख्यान देणार आहेत.दि.28 रोजी प्रा.राजाराम कांबळे हे राष्टीृय सेवा योजनेचे महत्त्व या विषयाची मांडणी करणार आहेत.दि.29 रोजी प्रा.आनंद साठे यांचे आनंदाचे डोही आनंद तरंग या विषयावर व्याख्यान होणार आहे.दि.28 रोजी हळदी कुंकू कार्यक्रम तर दि.29 रोजी मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित केले आहे.
     या शिबीरासाठी ग्रामपरी,रोटरी क्लब,रोट्रॅक्ट क्लब,एम.आर.ए.सेंटर,ग्रामपंचायत रूईघर आदींचे सहकार्य मिळणार आहे.संयोजन प्रकल्पाधिकारी प्रा.अनंता कस्तुरे,प्रा.जयंत शिंदे,प्रा.नरेंद्र फडतरे,डाॅ.प्रियदर्शनी कांबळे,प्रा.सुनील नवघरे,प्रा.मकरंद सकटे,डाॅ.सलीम पठाण ,बिरा घोगरे आदीजण करीत आहे.

Friday 17 January 2020

महेता काॅलेजमध्ये भरले वनस्पतीच्या पाने- फुलांपासून बनविलेल्या दागिने व अलंकाराचे प्रदर्शन









महेता काॅलेजमध्ये भरले वनस्पतीच्या पाने- फुलांपासून बनविलेल्या दागिने व अलंकाराचे प्रदर्शन
 
वनस्पतीशास्र विभागाचा "ज्ञानशिदोरी दिन " निमित्त उपक्रम 
 
पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस " ज्ञानशिदोरी दिन " म्हणून साजरा करण्यात आला.यानिमित्ताने वनस्पतीशास्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी वनस्पतीच्या पाने,फुले व बियांपासून विविध दागिने व अंलकार बनवून प्रदर्शन भरविले.या प्रर्दशनास प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
       विद्यार्थ्यांनी या प्रर्दशनात विविध वनस्पतीच्या पाने,फुले व बियांपासून कर्णफुले,हार व ब्रेसलेट असे विविध दागिने बनवून प्रर्दशन भरविले.या प्रर्दशनाचे उद् घाटन काॅमर्स विभागप्रमुख डाॅ.गोपीनाथ बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांनी केले.सूत्रसंचालन डाॅ.भाऊराव दांगट यांनी केले.आभार प्रा.उदय चौगुले यांनी मानले.प्रर्दशन पाहून प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी संयोजकाचे कौतुक केले.या प्रर्दशनास चांगला प्रतिसाद मिळाला.

फोटोओळीः महेता काॅलेजमध्ये वनस्पतीच्या पाने,फुले व बियांपासून विद्यार्थ्यांनी बनविलेले दागिने व अंलकार

प्राध्यापकांनी समाजात संस्काराची पेरणी करून समाजपरिवर्तन घडवावेः प्रा.अनंता कस्तुरे










प्राध्यापकांनी समाजात संस्काराची पेरणी करून समाजपरिवर्तन घडवावे :प्रा.अनंता कस्तुरे

महेता काॅलेजमध्ये "ज्ञानशिदोरी दिन "साजरा 

पाचगणीः श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्यअभयकुमार साळुंखे यांनी शैक्षणिक,सामाजिकआदी कार्यातून समाजात मूल्ये व संस्काराची रूजवणूक केली.हाच वसा व वारसा जपत त्यांचा वाढदिवस  " ज्ञानशिदोरी दिन " म्हणून साजरा करताना प्राध्यापकांनी समाजात संस्काराची पेरणी करून समाजपरिवर्तन घडवावे,असे मत मराठी विभागप्रमुख प्रा.अनंता कस्तुरे यांनी व्यक्त केले.
    पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस " ज्ञानशिदोरी दिन " म्हणून साजरा करण्यात आला यानिमित्ताने आयोजित  " ज्ञानशिदोरीकार प्राचार्य अभयकुमार साळुंखे " या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी डाॅ.गोपीनाथ बोत्रे होते.यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ.शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
  डाॅ.गोपीनाथ बोत्रे म्हणाले,प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य  सर्वांना आदर्शवत व प्रेरणादायी आहे.ज्ञानशिदोरी दिनाच्यानिमित्ताने प्रत्येकांनी समाजात ज्ञान,पुस्तके व चांगल्या सवयी याची जनजागृती करावी.यावेळी प्रा.सतिश कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.आभार प्रा.नितीन वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

फोटोओळीः महेता काॅलेजमध्ये ज्ञानशिदोरी दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा.अनंता कस्तुरे बाजूस डाॅ.गोपीनाथ बोत्रे,डाॅ शहाजी जाधव आदी

Tuesday 14 January 2020

पाचगणीत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरास प्रतिसाद










पाचगणीत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरास प्रतिसाद

पाचगणी :पाचगणीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला.या शिबीरात 87 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी विद्यार्थ्यांची  रक्तगट,हिमोग्लोबीन व एच.आय.व्ही तपासणीही करण्यात आली.
      पाचगणी रोटरी क्लब,सूर्योदय परिवार,रोट्रॅक्ट क्लब ऑफ मिनलबेन महेता कॉलेज , न्यु ईरा टिचर ट्रेनिंग सेंटर यांनी बालाजी ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन केले होते.  रक्तदान शिबिराच्या उदघाटन समारंभास रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि व सर्वोदय परिवाराचे प्रमुख मोहन प्रभाळे, सुनील धनावडे ,रोटरीचे सचिव सुनील कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  शहर व ग्रामीण भागातील युवक , धनावडे क्लासेसचे विद्यार्थी, न्यू ईरा टिचर ट्रेनिंग सेंटर चे विद्यार्थी महेता काॅलेजचे रोट्रॅक्टचे विद्यार्थी, सूर्योदय परिवाराचे सदस्य  तसेच रोटरी सदस्यांनी रक्तदान केले . धनावडे क्लासेस येथे सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात एकूण ८७ जणांनी रक्तदान केले .  या शिबिरात  विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, एचआयव्ही तपासणी तसेच विद्यार्थ्यांनीची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली .   सुनील धनावडे , प्रतिक प्रभाळे यांनी शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले   . बालाजी ब्लड बँकेचे अमोल जाधव यांनी आभार मानले.

फोटोओळीः पाचगणीत रक्तदान शिबीरात रक्तदान करताना रक्तदाते.

पाचगणीच्या इतिहासाचा रोटरी क्लबने केला औरंगाबादमध्ये जागर







पाचगणीच्या इतिहासाचा रोटरी क्लबने केला औरंगाबादमध्ये जागर
 
पाचगणीःरोटरी क्लब आॅफ पाचगणीने " रोटरी जगाला जोडते" या ब्रीदवाक्याप्रमाणे वडोद खुर्द ता.फुलंब्री जि.औरंगाबाद येथे जावून शालेय विद्यार्थ्यांमध्ये छ.शिवाजी महाराजांचे कार्य, पाचगणीचा इतिहास व महत्व आदी विषयीचा जागर केला आणि भेटवस्तू देत शिक्षक व विद्यार्थ्यांना पाचगणीला भेट देण्याचे आवाहन केले.
     रोटरी क्लब आॅफ पाचगणी समाजामध्ये सातत्याने विविध सामाजिक,सांस्कृतिक आदी उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबवित असते.रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि,सचिव सुनील कांबळे,माजी अध्यक्ष सुरेश बिरामणे,सदस्य अशोक पाटील,आर्दे सवार्द आदीजन औरंगाबादमध्ये रोटरीच्या वार्षिक परिषदेमध्ये सहभागी झाले होते.दरम्यान सर्वांनी औरंगाबाद,दौलताबाद किल्ला,एलोरा लेणी आदी ठिकाणी भेटी दिल्या.या भेटीदरम्यान वडोद खुर्द ता.फुलंब्री येथील जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची भेट घेतली.यावेळी मार्गदर्शन करताना रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानवर्दि म्हणाले,रोटरी जगाला जोडते या ब्रिदवाक्याप्रमाणे पाचगणी रोटरी क्लब सामाजिक उपक्रम म्हणून वडोद खुर्दच्या जिल्हा परिषद शाळेस पाचगणी क्लबशी जोडत आहोत.शिक्षक व विद्यार्थ्यांनी पाचगणी परिसरास भेट देवून येथील निसर्ग,इतिहास आदीची माहिती जाणून घ्यावी.यासाठी रोटरी क्लब सर्वप्रकारचे सहकार्य करील.
     रोटरी क्लबने औरंगाबादमध्ये जावून पाचगणीच्या इतिहासाचा जागर केल्याबद्दल क्लबचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.प्रास्ताविक रोटरीचे सचिव सुनील कांबळे यांनी केले.आभार अशोक पाटील यांनी मानले.यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.