Tuesday 7 January 2020

व्यावसायिक कोर्सेसमधून करिअर घडवाःप्रा.अक्षय आवटे

 मराठी भाषा संर्वधन पंधरवडानिमित्त व्याख्यान

      व्यावसायिक कोर्सेसमधून करिअर               घडवाःप्रा.अक्षय आवटे








  पाचगणीः पदवी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक कौशल्ये ही अनेक प्रकारच्या कोर्सेस व प्रशिक्षणातून विकसित करावित असे मत  एम.आय.टी.काॅलेज साताराचे प्रा.अक्षय आवटे यांनी व्यक्त केले.
  पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी विभाग आयोजित " पदवीनंतर मराठी भाषेतील करिअरच्या संधी " या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा.अनंता कस्तुरे,प्रा.जयंत शिंदे ,डाॅ.शहाजी जाधव,डाॅ.वामन सरगर,प्रा.माणिक वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
   प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,ग्रामीण भागातील तरूणांनी आवडत्या क्षेत्रात व्यावसायाभिमुख प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.नोकरीप्रमाणेच व्यवसायाचा पर्यायही प्रत्येकांनी निर्माण करायला हवा.
 प्रास्ताविक प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार डाॅ.वामन सरगर यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment