Tuesday 14 January 2020

पाचगणीत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरास प्रतिसाद










पाचगणीत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरास प्रतिसाद

पाचगणी :पाचगणीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला.या शिबीरात 87 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी विद्यार्थ्यांची  रक्तगट,हिमोग्लोबीन व एच.आय.व्ही तपासणीही करण्यात आली.
      पाचगणी रोटरी क्लब,सूर्योदय परिवार,रोट्रॅक्ट क्लब ऑफ मिनलबेन महेता कॉलेज , न्यु ईरा टिचर ट्रेनिंग सेंटर यांनी बालाजी ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन केले होते.  रक्तदान शिबिराच्या उदघाटन समारंभास रोटरीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि व सर्वोदय परिवाराचे प्रमुख मोहन प्रभाळे, सुनील धनावडे ,रोटरीचे सचिव सुनील कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  शहर व ग्रामीण भागातील युवक , धनावडे क्लासेसचे विद्यार्थी, न्यू ईरा टिचर ट्रेनिंग सेंटर चे विद्यार्थी महेता काॅलेजचे रोट्रॅक्टचे विद्यार्थी, सूर्योदय परिवाराचे सदस्य  तसेच रोटरी सदस्यांनी रक्तदान केले . धनावडे क्लासेस येथे सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात एकूण ८७ जणांनी रक्तदान केले .  या शिबिरात  विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, एचआयव्ही तपासणी तसेच विद्यार्थ्यांनीची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली .   सुनील धनावडे , प्रतिक प्रभाळे यांनी शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले   . बालाजी ब्लड बँकेचे अमोल जाधव यांनी आभार मानले.

फोटोओळीः पाचगणीत रक्तदान शिबीरात रक्तदान करताना रक्तदाते.

No comments:

Post a Comment