Monday 4 September 2023

महेता काॅलेजमध्ये शिक्षक दिन साजरा















श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती  प्रतिमा पूजन व व्याख्यान या उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

        कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते संतौष कवी,प्राचार्य डाॅ.सतीश देसाई ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.  

   मा.संतोष कवी म्हणाले,डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन  यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी तसेच देशाच्या सर्वांगिण विकासासाठी दिलेले योगदान सर्वांना आदर्शवत आहे.सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण आहे. 


    प्रास्ताविक डाॅ.अनंता कस्तुरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.लोमेशकुमार कोळेकर यांनी केले.आभार डॉ. आक्रम मुजावर यांनी मांडले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.



मीनलबेन महेता कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती प्रतिमा पूजन व व्याख्यान या उपक्रमांनी साजरी









श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती प्रतिमा पूजन व व्याख्यान या उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर,प्राचार्य डाॅ.सतीश देसाई ,प्रमुख वक्ते डाॅ.अनंता कस्तुरे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.

मा.लक्ष्मीताई कराडकर म्हणाल्या,संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी दिलेले योगदान सर्वांना प्रेरणादायी आहे.आज सर्वांनी त्यांचा आदर्श घेवून वाटचाल करावी.डाॅ. अनंता कस्तुरे यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे जीवनकार्य विषद केले.
       अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले , संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी भूमिगत चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांना तसेच  वसतीगृहातील  विद्यार्थ्यांना जेवण करून घातले. संस्थामातांनी संस्थेच्या विकास व विस्तारात दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. प्रास्ताविक प्रा. माणिक वांगीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.लोमेशकुमार कोळेकर यांनी केले.आभार डॉ. आक्रम मुजावर यांनी मांडले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.