Friday 20 September 2019

पाचगणीतील महेता काॅलेजमध्ये हिंदी दिन साजरा

 

हिंदी भाषेत व्यक्तिमत्वाच्या सर्वांगिण विकासाची क्षमता :डाॅ.जीतेन्र्द पांडेय

  पाचगणी : हिंदी ही देशातील महत्त्वपूर्ण भाषा असून या भाषेत व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास करण्याची क्षमता आहे.विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत ज्ञान संपादन करून साहित्य,स्पर्धा परीक्षा आदी क्षेत्रात करियर घडवावे ,असे मत सेंट पीटर्स कनिष्ठ काॅलेजचे हिंदी विभाग प्रमुख डाॅ.जीतेन्र्द पांडेय यांनी व्यक्त केले.

       पाचगणी येथील मीनलबेन महेता काॅलेजमध्ये हिंदी विभागाच्यावतीने आयोजित हिंदी दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी हिंदी विभागप्रमुख प्रा,नरेंद्र फडतरे, डाॅ.शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले ,विद्यार्थ्यांनी  काॅलेज जीवनातच मराठी,इंग्रजी,हिंदी भाषेचे ज्ञान आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास करावा.हिंदी भाषेत साहित्य,प्रसारमाध्यमे,शासकीय सेवा आदी क्षेत्रात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करून करिअर घडवावे.

प्रारंभी डाॅ.जीतेन्र्द पांडेय व प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते शब्दशिल्प या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन अनुज जगताप यांनी केले.आभार हिंदी विभाग प्रमुख नरेंद्र फडतरे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment