Thursday 15 August 2019

बातमी NEWS

" गाथा स्वातंत्र्यलढ्याची कथा स्वातंत्र्यसैनिकांची " पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम


               पुस्तक  प्रकाशन समारंभ

          
                      पुस्तक मुखपृृृष्ठ



                        संपादक परिचय


                      पुस्तक अनुक्रमणिका



"गाथा स्वातंत्र्यलढ्याची- कथा स्वातंत्र्यसैनिकांची" पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम,पुस्तकाच्या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळ व स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना मिळाला उजाळा
साताराः स्वातंत्र्य चळवळ व स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देणारे " गाथा स्वातंत्र्यलढ्याची कथा स्वातंत्र्यसैनिकांची "  या पुस्तकाचे प्रकाशन साताराचे पालकमंत्री व जलसंधारण मंत्री ना.विजय शिवतारे यांच्या हस्ते व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली  तसेच महाराष्टृृृृ कृृृष्णा खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष ना.नितीन बानुगडे- पाटील,संस्थेचे सहसचिव व जन्मशताब्दी वर्ष  महोत्सव समितीचे सचिव व प्राचार्य डाॅ                     राजेंद्र शेजवळ,स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे अध्यक्ष प्राचार्य दिलीपराव संकपाळ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तकाचे संपादन प्रा.डाॅ.महेश गायकवाड,प्रा.अनंता कस्तुरे,श्री.शंकर शिंदे यांनी केले आहे.

      सातारा येथील शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षणमहर्षी व स्वातंत्र्य सैनिक डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव समारंभ , पुस्तक प्रकाशन व शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे स्मृतीदिन विशेषांक प्रकाशन सोहळा संपन्र झाला.
   सदरचे पुस्तक सर्व स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना भेट देण्यात आले.या पुस्तकामुळे स्वातंत्र्य चळवळ,भूमिगत चळवळ,संयुक्त महाराष्टाृची चळवळ,गोवा सत्याग्रह तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा मिळाला.हे पुस्तक तरूणांच्यात व समाजात देशप्रेम व त्याग निर्माण करेल अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व स्वातंत्र्यसैनिकांनी व्यक्त केल्या.या 
    पुस्तकाची सजावट व मुद्रन कृृृृृषिकेश सारडा यांनी केले आहे.पुस्तकासाठी प्रा,डाॅ.आत्माराम थोरात, प्रा.डाॅ.प्रतिभा चिकमठ यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment