Thursday 8 August 2019

पाचगणीत शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांचा स्मृृृतीदिन साजरा

  1. शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविले : प्राचार्य डाॅ.अरूण गाडे


 पाचगणी:  शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविले.बापूजींचे शिक्षण,सामाजिक,स्वातंत्र्य चळवळ आदी क्षेत्रातील कार्य आर्दशवत आहे.तरूणांनी बापूजींचा वारसा पुढे चालवावा,असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी व्यक्त केले.

     पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज,पाचगणी येथे शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांचा 32 वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.यावेळी  ते  बोलत होते.यावेळी पाचगणीचे पोलीस उपनिरीक्षक व संस्थेचे माजी विद्यार्थी मा.विकास बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 प्राचार्य डाॅ अरुण गाडे व पोलीस उपनिरीक्षक मा.विकास बडवे यांच्या हस्ते  शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे,संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
       प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी दिनदलित ,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी संस्थेची स्थापना केली.बापूजींनी शिक्षणातून समाजात परिवर्तन घडविले.बापूजींचे शिक्षण,सामाजिक,स्वातंत्र्य चळवळ,साहित्य आदी क्षेत्रातील कार्य आर्दशवत आहे.
      प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.राजाराम कांबळे यांनी केले.आभार प्रा.अनंता कस्तुरे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment