Saturday 31 August 2019

महेता काॅलेजमध्ये HIV/AIDS व हिमोग्लोबीन चाचणी आणि आरोग्यविषयक शिबीर संपन्न

 







 महेता काॅलेजमध्ये HIV/ AIDS व हिमोग्लोबीन चाचणी आणि आरोग्यविषयक जनजागृती शिबीर संपन्न

पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये HIV/ AIDS व हिमोग्लोबीन चाचणी वआरोग्यविषयक जनजागृती शिबीर तसेच महाविद्यालयीन युवतींचे आरोग्य याविषयी व्याख्यान संपन्न झाले.या उपक्रमात 164 विद्यार्थ्यांची HIV/AIDS व हिमोग्लोबीन चाचणी घेण्यात आली .

  रोटरी क्लब आॅफ पाचगणी ,काॅलेजचा रोटॅृक्ट क्लब आणि महाविद्यालयातील समाजशास्र विभाग,राष्टीृय सेवा योजना,आरोग्य विभाग व महिला सक्षमीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, पाचगणी यांचे सहकार्य लाभले.
    HIV/AIDS व हिमोग्लोबीन चाचणी शिबीराचे उद् घाटन रोटरी क्लब आॅफ पाचगणीचे अध्यक्ष शहाराम जवनमर्दि,सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे,प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रोटरी क्लबचे सचिव सुनिल कांबळे,महेंद्र पांगारे,अशोक पाटील,भारत पुरोहित,जयवंत भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         महाविद्यालयातील   164 विद्यार्थ्यांची HIV / AIDS व हिमोग्लोबीन ची चाचणी  डाॅ.वनिता तावरे व डाॅ निलेश सणस यांनी केली.HIV/ AIDS विषयी मार्गदर्शन करताना एकात्मक सल्ला व चाचणी केंद्र,पाचगणीच्या समुपदेशक डाॅ.वनिता तावरे म्हणाल्या,युवकांनी HIV/AIDS विषयी मनात असलेले गैरसमज प्रथम दूर केले पाहिजेत.युवकांनी याबाबतची माहिती घेवून,स्वतः साक्षर
होवून तशी समाजात जनजागृती करावी.
  अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,समाजात बेकारी,एडस् ,गुन्हेगारी  अशा सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.शासन,सामाजिक संस्थांबरोबर महाविद्यालयीन युवकांनीही या सामाजिक  समस्या सोडविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.सामाजिक जाणिवेतून विविध प्रश्नांची जनजागृती समाजात करावी.
      प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॅ.सादिका खान यांनी महाविद्यालयीन युवतींचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.
  प्रास्ताविक प्रा.संतोष निलाखे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांनी केले.आभार डाॅ.शहाजी जाधव यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment