Tuesday 20 August 2019

गिरिस्थान न्यूज

 
 पाचगणीत महेता काॅलेजची महापूरग्रस्तांसाठी                मदत निधी संकलन फेरी

 11 हजार रूपये व 50 बेडसिटचे केले संकलन







पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व पाचगणी शहरातून महापूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन फेरी काढली.महाविद्यालयाने जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे अनेकांनी कौतुक करीत महापूरग्रस्तांसाठी 50 बेडसेट व   11 हजाराची आर्थिक मदत केली.संकलित केलेला निधी व बेडसेट या पूरग्रस्तांना प्रत्यक्ष देण्यात येणार आहेत.
        सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापूरामुळे प्रंचड नुकसान झाले आहे.पूरग्रस्तांना शासन,सामाजिक संस्था आदींच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत केली जात आहे.महाविद्यालयाच्या राष्टीृय सेवा योजना विभागानेही सामाजिक बांधिलकी जपत पाचगणी शहर व महाविद्यालयातून मदत निधी संकलन फेरी काढली.काॅलेजच्या या उपक्रमास पाचगणीकरांनी प्रतिसाद देत 11 हजार रूपयांची मदत केली.माजी नगरसेवक व काॅलेजचे माजी विद्यार्थी सचिन भिलारे यांनी पूरग्रस्तांना 50 बेडसेट दिल्या.
        प्राचार्य डाॅ.अरूण गाडे मार्गदर्शन करताना म्हणाले पूरग्रस्त लोक अनेक अडचणी,समस्यांना सामोरे जात आहेत.पूरग्रस्तांना सर्वप्रकारची मदत करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.सामाजिक बांधिलकी जपत सर्वांनी पूरग्रस्तांना मदत व सहकार्य करावे.प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांवर दानधर्म,एकात्मता,सहकार्य हे संस्कार करून सक्षम पिढी घडवावी. पूरग्रस्तांसाठीच्या मदत फेरीत सर्व प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले.संयोजन प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव यांच्यासह राष्टीृृृय सेवा योजना विभागातील सर्व सदस्यांनी केले.
        

No comments:

Post a Comment