Saturday, 31 August 2019
महेता काॅलेजमध्ये HIV/AIDS व हिमोग्लोबीन चाचणी आणि आरोग्यविषयक शिबीर संपन्न
महेता काॅलेजमध्ये HIV/ AIDS व हिमोग्लोबीन चाचणी आणि आरोग्यविषयक जनजागृती शिबीर संपन्न
पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये HIV/ AIDS व हिमोग्लोबीन चाचणी वआरोग्यविषयक जनजागृती शिबीर तसेच महाविद्यालयीन युवतींचे आरोग्य याविषयी व्याख्यान संपन्न झाले.या उपक्रमात 164 विद्यार्थ्यांची HIV/AIDS व हिमोग्लोबीन चाचणी घेण्यात आली .
रोटरी क्लब आॅफ पाचगणी ,काॅलेजचा रोटॅृक्ट क्लब आणि महाविद्यालयातील समाजशास्र विभाग,राष्टीृय सेवा योजना,आरोग्य विभाग व महिला सक्षमीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, पाचगणी यांचे सहकार्य लाभले.
HIV/AIDS व हिमोग्लोबीन चाचणी शिबीराचे उद् घाटन रोटरी क्लब आॅफ पाचगणीचे अध्यक्ष शहाराम जवनमर्दि,सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे,प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रोटरी क्लबचे सचिव सुनिल कांबळे,महेंद्र पांगारे,अशोक पाटील,भारत पुरोहित,जयवंत भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयातील 164 विद्यार्थ्यांची HIV / AIDS व हिमोग्लोबीन ची चाचणी डाॅ.वनिता तावरे व डाॅ निलेश सणस यांनी केली.HIV/ AIDS विषयी मार्गदर्शन करताना एकात्मक सल्ला व चाचणी केंद्र,पाचगणीच्या समुपदेशक डाॅ.वनिता तावरे म्हणाल्या,युवकांनी HIV/AIDS विषयी मनात असलेले गैरसमज प्रथम दूर केले पाहिजेत.युवकांनी याबाबतची माहिती घेवून,स्वतः साक्षर
होवून तशी समाजात जनजागृती करावी.
होवून तशी समाजात जनजागृती करावी.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,समाजात बेकारी,एडस् ,गुन्हेगारी अशा सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.शासन,सामाजिक संस्थांबरोबर महाविद्यालयीन युवकांनीही या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.सामाजिक जाणिवेतून विविध प्रश्नांची जनजागृती समाजात करावी.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॅ.सादिका खान यांनी महाविद्यालयीन युवतींचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रा.संतोष निलाखे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांनी केले.आभार डाॅ.शहाजी जाधव यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
Tuesday, 27 August 2019
Tuesday, 20 August 2019
गिरिस्थान न्यूज
पाचगणीत महेता काॅलेजची महापूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन फेरी
11 हजार रूपये व 50 बेडसिटचे केले संकलन
पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व पाचगणी शहरातून महापूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन फेरी काढली.महाविद्यालयाने जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे अनेकांनी कौतुक करीत महापूरग्रस्तांसाठी 50 बेडसेट व 11 हजाराची आर्थिक मदत केली.संकलित केलेला निधी व बेडसेट या पूरग्रस्तांना प्रत्यक्ष देण्यात येणार आहेत.
सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापूरामुळे प्रंचड नुकसान झाले आहे.पूरग्रस्तांना शासन,सामाजिक संस्था आदींच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत केली जात आहे.महाविद्यालयाच्या राष्टीृय सेवा योजना विभागानेही सामाजिक बांधिलकी जपत पाचगणी शहर व महाविद्यालयातून मदत निधी संकलन फेरी काढली.काॅलेजच्या या उपक्रमास पाचगणीकरांनी प्रतिसाद देत 11 हजार रूपयांची मदत केली.माजी नगरसेवक व काॅलेजचे माजी विद्यार्थी सचिन भिलारे यांनी पूरग्रस्तांना 50 बेडसेट दिल्या.
प्राचार्य डाॅ.अरूण गाडे मार्गदर्शन करताना म्हणाले पूरग्रस्त लोक अनेक अडचणी,समस्यांना सामोरे जात आहेत.पूरग्रस्तांना सर्वप्रकारची मदत करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.सामाजिक बांधिलकी जपत सर्वांनी पूरग्रस्तांना मदत व सहकार्य करावे.प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांवर दानधर्म,एकात्मता,सहकार्य हे संस्कार करून सक्षम पिढी घडवावी. पूरग्रस्तांसाठीच्या मदत फेरीत सर्व प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले.संयोजन प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव यांच्यासह राष्टीृृृय सेवा योजना विभागातील सर्व सदस्यांनी केले.
Thursday, 15 August 2019
NEWS
साप्ताहिक स्वाभिमानच्या "शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे स्मृृृृतीदिन विशेषांक" अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
साप्ताहिक स्वाभिमानच्या " शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे स्मृृृृतीदिन विशेषांक" अंकाचे प्रकाशन जलसंपदा ,जलसंधारण व संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय शिवतारे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष ना.नितीन बानुगडे - पाटील,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे,संस्थेचे सहसचिव मा. प्राचार्य डाॅ आर. व्ही. शेजवळ ,प्राचार्य दिलीपराव संकपाळ ,प्राचार्य एस .टी. कदम आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साप्ताहिक स्वाभिमानचे संपादक श्री शंकर शिंदे उपस्थित होते.
बातमी NEWS
" गाथा स्वातंत्र्यलढ्याची कथा स्वातंत्र्यसैनिकांची " पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम
पुस्तक प्रकाशन समारंभ
पुस्तक मुखपृृृष्ठ
संपादक परिचय
पुस्तक अनुक्रमणिका
"गाथा स्वातंत्र्यलढ्याची- कथा स्वातंत्र्यसैनिकांची" पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम,पुस्तकाच्या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळ व स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना मिळाला उजाळा
साताराः स्वातंत्र्य चळवळ व स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देणारे " गाथा स्वातंत्र्यलढ्याची कथा स्वातंत्र्यसैनिकांची " या पुस्तकाचे प्रकाशन साताराचे पालकमंत्री व जलसंधारण मंत्री ना.विजय शिवतारे यांच्या हस्ते व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्टृृृृ कृृृष्णा खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष ना.नितीन बानुगडे- पाटील,संस्थेचे सहसचिव व जन्मशताब्दी वर्ष महोत्सव समितीचे सचिव व प्राचार्य डाॅ राजेंद्र शेजवळ,स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे अध्यक्ष प्राचार्य दिलीपराव संकपाळ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तकाचे संपादन प्रा.डाॅ.महेश गायकवाड,प्रा.अनंता कस्तुरे,श्री.शंकर शिंदे यांनी केले आहे.
सातारा येथील शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षणमहर्षी व स्वातंत्र्य सैनिक डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव समारंभ , पुस्तक प्रकाशन व शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे स्मृतीदिन विशेषांक प्रकाशन सोहळा संपन्र झाला.
सदरचे पुस्तक सर्व स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना भेट देण्यात आले.या पुस्तकामुळे स्वातंत्र्य चळवळ,भूमिगत चळवळ,संयुक्त महाराष्टाृची चळवळ,गोवा सत्याग्रह तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा मिळाला.हे पुस्तक तरूणांच्यात व समाजात देशप्रेम व त्याग निर्माण करेल अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व स्वातंत्र्यसैनिकांनी व्यक्त केल्या.या
पुस्तकाची सजावट व मुद्रन कृृृृृषिकेश सारडा यांनी केले आहे.पुस्तकासाठी प्रा,डाॅ.आत्माराम थोरात, प्रा.डाॅ.प्रतिभा चिकमठ यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
Wednesday, 14 August 2019
Thursday, 8 August 2019
पाचगणीत शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांचा स्मृृृतीदिन साजरा
- शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविले : प्राचार्य डाॅ.अरूण गाडे
पाचगणी: शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविले.बापूजींचे शिक्षण,सामाजिक,स्वातंत्र्य चळवळ आदी क्षेत्रातील कार्य आर्दशवत आहे.तरूणांनी बापूजींचा वारसा पुढे चालवावा,असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी व्यक्त केले.
पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज,पाचगणी येथे शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांचा 32 वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी पाचगणीचे पोलीस उपनिरीक्षक व संस्थेचे माजी विद्यार्थी मा.विकास बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डाॅ अरुण गाडे व पोलीस उपनिरीक्षक मा.विकास बडवे यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे,संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी दिनदलित ,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी संस्थेची स्थापना केली.बापूजींनी शिक्षणातून समाजात परिवर्तन घडविले.बापूजींचे शिक्षण,सामाजिक,स्वातंत्र्य चळवळ,साहित्य आदी क्षेत्रातील कार्य आर्दशवत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)