Tuesday 8 August 2023

मेहता कॉलेजमध्ये ह.भ.प.दत्रात्रय महाराज कळंबे जयंती साजरी









मेहता कॉलेजमध्ये ह.भ.प.दत्रात्रय महाराज कळंबे जयंती साजरी


  श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये ह .भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांची जयंती प्रतिमापूजन,दीपप्रज्वलन व व्याख्यान या उपक्रमांनी  साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह .भ .प . विनोद कळंबे महाराज होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सतीश देसाई होते.  यावेळी उपप्राचार्य प्रा. नरेंद्र फडतरे,सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,डाॅ.आक्रम मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
         ह. भ. प .विनोद कळंबे महाराज म्हणाले की ,
ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांनी वाई,महाबळेश्र्वर,जावळी 
परिसराचा  सर्वांगीण विकास केलेला आहे.महाराजांचा धार्मिक आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक ,क्रीडा क्षेत्रातील कार्याचा वारसा तरुणांनी जपावा. महाराजांचे विविधांगी कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे  गरजेचे आहे. 
        प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले कळंबे महाराज यांच्यामुळेच आम्ही घडलो. महाराजांच्या आशीर्वादामुळेच  महेता कॉलेज सर्वांगीन विकास करीत आहे. महाविद्यालयाच्या विकासात कळंबे महाराजांचे योगदान महत्त्वपूर्ण असे आहे.
    प्रास्ताविकात  सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अनंता कस्तुरे यांनी ह. भ .प. कळंबे महाराज यांनी सहकार,कृषी ,धार्मिक, क्रीडा शैक्षणिक आदी क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. ह .भ. प. दत्रात्रय महाराज यांनी देवमाणसाप्रमाणे समाजाची सेवा केली. कार्यक्रमाचे आभार डॉ.आक्रम मुजावर यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक. प्रशासकीय सेवक व विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment