Tuesday 1 August 2023

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन










श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभाग व मराठी विभागाच्यावतीने  दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन प्रतिमा पूजन व व्याख्यान या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 
        कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. नगरसेविका सौ. सुलभाताई लोखंडे, मा. प्राचार्य गलांडे, प्रमुख वक्ते प्रा. लोमेशकुमार कोळेकर, उपप्राचार्य प्रा. नरेंद्र फडतरे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करुन महामानवांना अभिवादन करण्यात आले.  
         कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. लोमेशकुमार कोळेकर यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्य या विषयावर व्याख्यान दिले प्रा. कोळेकर म्हणाले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात केलेले कार्य सर्वांना दिशादर्शक आहे. समाजातील विविध सामाजिक प्रश्न त्यांनी वास्तवपणे साहित्यातून मांडले. त्यांच्या शाहिरीने तर सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केले. लोकमान्य टिळक यांचे देशसेवा व सामाजिक, सांस्कृतिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
         अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य गलांडे सर म्हणाले अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्य देशाला दिशा देणारे ठरले आहे. रयतेच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माणिक वांगीकर यांनी केले. आभार डॉ. आक्रम मुजावर यांनी मांडले. या कार्यक्रमास सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनंता कस्तुरे यांच्या सह सर्व प्राध्यापक वृंद, शासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment