Tuesday 8 August 2023

मेहता कॉलेजमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 36 वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा
















श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेजमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 36 वा स्मृतिदिन प्रतिमा पूजन, दीपप्रज्ज्वलन,पूतळा अभिवादन व व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .

महाविद्यालयातमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रा. माणिक वांगीकर,माजी विद्यार्थी संघाचे सचिव संजय आब्रांळे,प्र. प्राचार्य डॉ.बी. एन. कोकरे, कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.नरेंद्र फडतरे ,सांस्कतिक विभागप्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,राष्टीृय सेवा योजना समन्वयक प्रा.मकरंद सकटे,डाॅ.आक्रम मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.माणिक वांगीकर म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आदी क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. बापूजी यांच्यामुळेच महाराष्ट्रातील दीनदलित ,झोपडपट्टी व सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. त्यांचे तत्त्वज्ञान आणि कार्य सर्वांना दिशादर्शक आहे .आजच्या तरुणांनी बापूजींचा वारसा जतन करावा असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र.प्राचार्य डॉ.बाळासाहेब कोकरे म्हणाले ,शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्यामुळेच पाचगणी व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त झाली. बापूजींच्यामुळेच
सर्वसामान्यांना अपेक्षित शिक्षण मिळाले.त्यामुळे बापूजींचे कार्य लौकिक असेच आहे.

माजी विद्यार्थी संघाचे सचिव संजय आब्रांळे म्हणाले शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी मेहता कॉलेज काढले त्यामुळेच परिसरातले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात नोकरी व उद्योग क्षेत्रात भरारी घेऊ शकले .बापूजींच्या मुळेच आमच्या जीवनात परिवर्तन घडलेले आहे.

प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अनंता कस्तुरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.लोमेशकुमार कोळेकर यांनी केले. आभार डॉ. मुजावर आक्रम यांनी मानले .कार्यक्रमास गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment