Wednesday 9 June 2021

बापूजींनी शिक्षणातून सुसंस्काराची पिढी घडविलीः प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर






बापूजींनी शिक्षणातून सुसंस्काराची पिढी घडविलीःप्राचार्य श्रीनिवास वाळवेकर 

 पाचगणीः शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणातून ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्काराची पिढी घडविली.बापूजींचे तत्वज्ञान तरूणांनी आत्मसात करून जीवनाला व करिअरला दिशा द्यावी,असे प्रतिपादन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी व्यक्त केले.

   पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज ,श्रीमती कांताबेन जे.पी.महेता ज्युनिअर काॅलेज व महात्मा फुले हायस्कूल या सर्व शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे शैक्षणिक संकूल पाचगणीच्यावतीने शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे होते.यावेळी प्रा.मानाजी शिंदे,प्रा.सतिश कुदळे.प्रा.संतोष निलाखे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     प्र.प्राचार्य प्रो.डाॅ किरण शिंदे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले,शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे या ज्ञानसूर्याने गावोगावी सर्वसामान्यांना शिक्षणरूपी प्रकाश दिला.यामुळेच गोरगरिब,दिनदलितांची मुले शिक्षण घेवू शकली.बापूजींचे ज्ञानदानाचे कार्य सर्वांना प्रेरणादायी असे आहे. 

      यानिमित्ताने सेवानिवृत्त झालेबद्दल प्रा.मानाजी शिंदे यांचा प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार तसेच स्वामी विवेकानंद व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.संतोष निलाखे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment