Friday 25 June 2021

प्रा.अनंता कस्तुरे यांना " मराठीच्या गुप्त बोली " संशोधनासाठी पीएच.डी पदवी प्रदान




प्रा.अनंता कस्तुरे यांना " मराठीच्या गुप्त बोली " संशोधनासाठी पीएच.डी.पदवी प्रदान

पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.अनंता कस्तुरे यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली.त्यांनी बोली भाषेचे अभ्यासक डाॅ.नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली " मराठी समूहाच्या गुप्त बोलींचा अभ्यास " या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले.
प्रा.अनंता कस्तुरे यांचे मराठीच्या गुप्त बोली याबाबतचे महत्वपूर्ण व गुप्त बोलींचा उलगडा करणारे असे संशोधन आहे.त्यांनी सदर संशोधन प्रबंधामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती,आदिवासी जमाती,विविध संप्रदाय,व्यावसायिक अशा अनेकविध मराठी समूहाच्या गुप्त बोलींचे समाजभाषावैज्ञानिक,समाजशास्रीय व तौलनिकदृष्टीने विश्लेषण केलेले आहे. मराठी समुहातील पारसी,चिडक,जंगली,डागुरी,छप्परबंद,बागवानी,बोटमोडी,करपल्लवी इ. 30 गुप्त बोलींची संपर्कप्रक्रिया व संप्रेषण व्यवहार,शब्दभांडार,वर्णमाला,व्याकरणविशेष,इतर भाषांचा प्रभाव ,गुप्त बोली निर्मितीप्रक्रिया,गुप्त बोलीचा इतिहास,हेतूआदीबाबतची मांडणी केलेली आहे. प्रा.अनंता कस्तुरे यांनी यापूर्वी M.A, B.Ed,NET,M.Phil,D.JC,L.TC अशा शैक्षणिक पदव्या प्राप्त केलेल्या आहेत.त्यांना एम.फिल संशोधनासाठी यापूर्वी कोलमहर्षी पुरस्कार,शोधनिबंधासाठी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे दोन उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार,कवितेसाठी प्रतिभासंगम ,देशभक्त बळवंतराव मगर प्रतिष्ठानचा विशेष गौरव पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रा.कस्तुरे यांनी दै.पुढारी,ललकार,जनप्रवास,अग्रदूत या दैनिकात बातमीदार व विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून काम केले आहे.त्यांचे 27 शोधनिंबध प्रसिध्द असून विविध वृत्तपत्रे,साप्ताहिक,मासिके आदीमध्ये कविता,कथा,पुस्तक परीक्षणे,लेख प्रसिध्द झाले आहेत.त्यांनी " गाथा स्वातंत्र्य लढ्याची कथा स्वातंत्र्यसैनिकांची " , " लक्ष्मीकांत देशमुख यांचे समग्र साहित्य " या पुस्तकांचे संपादन केले आहे.
प्रा.कस्तुरे यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केलेबद्दल श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,सचिव प्राचार्या सौ.शुभांगी गावडे,प्रशासन सहसचिव प्राचार्य डाॅ.युवराज भोसले, अर्थसहसचिव प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ,प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment