Thursday 8 April 2021

मराठी विभागाची आठ पुरस्कार प्राप्त विद्यार्थीनी सौ.स्वाती राजगुरू हिचा सत्कार


     पुरस्कार प्राप्त सौ.स्वाती राजगुरू हिचा सत्कार              करताना प्राचार्य डाॅ.किरण शिंदे

पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील मराठी विभागाची माजी विद्यार्थींनी सौ.स्वाती राजगुरू हिला शिवाजी विद्यापीठ एम.ए.मराठी विषयासाठी विद्यापीठाचे विविध आठ पुरस्कार प्राप्त झाले.याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने सौ.स्वाती राजगुरू हिचा प्राचार्य डाॅ.किरण शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विविध पुरस्कार प्राप्त झालेबद्दल सौ.स्वाती राजगुरू हिचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
                   श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभागाच्यावतीने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डाॅ.किरण शिंदे होते.यावेळी डाॅ.बी.एन.कोकरे, संतोष कवी,प्रकाश गोळे,मराठी विभागप्रमुख प्रा.अनंता कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.सौ.राजगुरू हिला कवी माधव ज्युलीयन,कथाकार चारूता सागर,प्रो.गो.मा.पवार पुरस्कार असे आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.                           
       प्राचार्य डाॅ.किरण शिंदे म्हणाले,यश प्राप्त करण्यासाठी व गुणवंत होण्यासाठी कष्ट व जिद्दी स्वभाव असणे आवश्यक आहे.शिवाजी विद्यापीठाचे एकावेळी आठ पुरस्कार मिळवून मराठी विषयात सौ.स्वाती राजगुरू हिने यशाचे शिखर गाठले आहे.तिचा आदर्श घेवून सर्वांनी मार्गक्रमण केले पाहिजे.तिच्या यशामुळे महेता काॅलेजच्या वैभव,यश व गुणवत्तेत भर पडली आहे. सौ.स्वाती राजगुरू हिने मनोगतात काॅलेज,प्राध्यापक ,कुंटुबिय व समाजाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार डाॅ.वामन सरगर यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment