Friday 12 February 2021

पाचगणीकर " बंध नात्यांचा गंध कवितांचा " कार्यक्रमात मंत्रमुग्ध

पाचगणीकर "बंध नात्यांचा गंध कवितांचा" कार्यक्रमात मंत्रमुग्ध

पाचगणीः शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेत प्रा.सौ.लता ऐवळे यांनी " बंध नात्यांचा गंध कवितांचा " या कवितेच्या कार्यक्रमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी सादर केलेल्या बाप,फोर जी डाउनलोडिंग,असं पत्रात लिहा या कवितांला व जात्यांवरच्या ओव्यांना रसिकांनी मनमुराद दाद दिली.
पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी
साळुंखे व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंपताना "बंध नात्यांचा गंध कवितांचा " या विषयावरील
व्याख्यान्यात प्रा.सौ.लता ऐवळे यांनी कविता सादर केल्या.अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्षा सौ.सुलभा लोखंडे होते. यावेळी प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे, प्राचार्य यशवंत फरांदे,जगन्नाथ शिंदे गुरूजी, जे.के.आंब्राळे,मनोहर
समन्वयक डॉ.भाऊराव दांगट,सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ.सुलभा लोखंडे म्हणाल्या पाचगणीतील व्याख्यानमालेने चांगल्या कार्याची परंपरा निर्माण केली आहे.घराघरात चांगले संस्कार करण्याचे कार्य उल्लेखनिय आहे. प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय प्रा.सुनील नवघरे यांनी करून
दिला.सूत्रसंचालन डाॅ.तुकाराम राबाडे व सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे यांनी
मानले.यावेळी प्रा.सौ.लता ऐवळे यांच्या हस्ते भाग्यवंत श्रोता कुपन काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात
आली.यावेळी प्रा.सौ.लता ऐवळे यांच्या हस्ते प्रा.माणिक वांगीकर यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानास
प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

 फोटोओळी : पाचगणी येथे महेता काॅलेज आयोजित व्याख्यानमालेत बोलताना प्रा.सौ.लता ऐवळे बाजूस उपनगराध्यक्षा सौ.सुलभा लोखंडे,प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे, जगन्नाथ शिंदे गुरूजी आदी.

No comments:

Post a Comment