Thursday 11 February 2021

तरूणांनी छ.शिवरायांची जीवनमूल्ये आत्मसात करून यशाचा गड जिंकावा : प्रशांत देशमुख

तरूणांनी छ.शिवरायांची जीवनमूल्ये आत्मसात करून यशाचा गड जिंकावाः प्रशांत देशमुख


















पाचगणी .छ.शिवाजी महाराजांची राजकीय,सामाजिक,धार्मिक,नैतिक आदी जीवनमूल्ये ही जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी अशी आहेत.तरूणांनी छ. शिवरायांची सर्व जीवनमूल्ये आत्मसात करून जीवनाच्या यशाचा गड जिंकावा असे आवाहन प्रसिध्द शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी व्यक्त
केले.
           पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंपताना " प्रतापगडचे युध्द " या विषयावरील व्याख्यानात देशमुख बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे होते. यावेळी प्रविण भिलारे,शशिकांत भिलारे,प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे, प्राचार्य यशवंत फरांदे,जगन्नाथ शिंदे गुरूजी,सरपंच जानू पांगारे,मंगेश उपाध्ये,डाॅ.अनिल बोधे,जे.के.आंब्रांळे,संपत खरात,समन्वयक डॉ.भाऊराव दांगट,सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

      अध्यक्षस्थानावरून बोलताना नानासाहेब कासुर्डे म्हणाले,पाचगणीतील व्याख्यानमालेने चांगल्या विचारांची पेरणी केल्यामुळेच पाचगणीचा सर्वांगिण विकास झाला. महेता काॅलेजचे शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी महाबळेश्र्वर तालुका समन्वयक समितीचे अध्यक्ष प्रविण भिलारे यांनी मनोगत व्यक्त केले.
      पाहुण्यांचा परिचय प्रा.नरेंद्र फडतरे यांनी करून
दिला.सूत्रसंचालन डाॅ.प्रियदर्शनी कांबळे व सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.सतीश कुदळे यांनी मानले.यावेळी मा.प्रशांत देशमुख यांच्या हस्ते भाग्यवंत श्रोता कुपन काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.मा.देशमुख यांच्या हस्ते एलआयसीचा पुरस्कार प्राप्त केलेबद्दल संजय आंब्राळे यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानास
प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

 फोटोओळी : पाचगणी येथे महेता काॅलेज आयोजित व्याख्यानमालेत बोलताना मा.प्रशांत देशमुख बाजूस माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे,प्रविण भिलारे ,प्र.प्राचार्य डाॅ.बी.एन.कोकरे,समाजसेवक राम जाधव आदी.

No comments:

Post a Comment