Tuesday 27 September 2022

महेता काॅलेजमध्ये " युवा महोत्सव व व्यक्तिमत्व विकास " विषयावर कार्यशाळा संपन्न

महेता काॅलेजमध्ये " युवा महोत्सव व व्यक्तिमत्व विकास " विषयावर कार्यशाळा संपन्न


 पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभाग व युवा महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ अग्रणी काॅलेज योजने अंतर्गत " युवा महोत्सव व व्यक्तिमत्व विकास " या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध कला प्रकार व व्यक्तिमत्व विकासाचे विविध टप्पे याविषयी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.

    या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे प्रसिध्द नाट्य लेखक व दिग्दर्शक प्रा.जोतीराम आंबवडे , मिरज हे होते.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.यावेळी मराठी विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे व इतिहास विभाग प्रमुख आणि युवा महोत्सव समितीच्या प्रमुख डाॅ.सुनिता गित्ते,प्रा.प्रियांका कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
  प्रा.जोतीराम आंबवडे म्हणाले, युवकांचा काॅलेजचे शिक्षण घेतानाच व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे असते.तरूणांनी आपल्यातील सुप्त कला गुणांचा विकास करावा. आवडत्या क्षेत्रात करिअर निवडून त्यामध्ये यशाचे शिखर गाठावे.
 
प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले, विद्यार्थ्यांनी काॅलेजमधील विविध उपक्रमात व स्पर्धामध्ये सहभागी होणे करिअर घडविण्यादृष्टीने महत्वाचे आहे.युवा महोत्सवाच्या निमित्ताने अंगी असणार्‍या सुप्त कलांचा व कौशल्यांचा विकास करावा.

    प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डाॅ.अनंता कस्तुरे यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा.प्रियांका कुंभार यांनी केले.आभार डाॅ.सुनिता गित्ते यांनी मानले.कार्यशाळेस प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.










No comments:

Post a Comment