Tuesday 6 September 2022

महेता काॅलेजमध्ये पाचगणीचा इतिहास पुस्तकाचे प्रकाशन

            मराठी व इतिहास विभागाचा उपक्रम





महेता काॅलेजमध्ये पाचगणीचा इतिहास पुस्तकाचे प्रकाशन

पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये डाॅ.सुनील पवार लिखित पाचगणीचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन सहसचिव प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ,ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे,मुख्याधिकारी गिरीश दापकेकर,पोलीस निरीक्षक सतीश पवार आदी मान्यवरांच्या हस्ते व प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभाग व इतिहास विभागाच्यावतीने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.वेळेकामठी गावचे सुपूत्र प्रा.डाॅ.सुनील दिनकर पवार यांच्या पाचगणीचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास (सन 1910 ते 1985) या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास प्रमुख पाहुणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन सहसचिव प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ,ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे,मुख्याधिकारी गिरीश दापकेकर,पोलीस निरीक्षक सतीश पवार,महाबळेश्र्वर तालुका समन्ववय समितीचे अध्यक्ष प्रविण भिलारे होते.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.युवा उद्योजक प्रकाश गोळे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अमर बिरामणे,लाल बहादुर शास्री काॅलेजचे मराठी विभागप्रमुख डाॅ.अशोक तवर,डाॅ.एस.एम.पवार,मराठी विभागप्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,इतिहास विभागप्रमुख डाॅ.सुनिता गित्ते,प्रा.माणिक वांगीकर,प्रा.रेश्मा देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती .

प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ म्हणाले,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील गुरूदेव कार्यकर्ता पाचगणीतील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक इतिहासावर संशोधन करून पुस्तक प्रकाशित करतो ही बाब संस्थेसाठी व समाजासाठी प्रेरणादायी आहे.या पुस्तकात पाचगणी व परिसरातील दिलेली नेमकी माहिती खर्‍या अर्थाने पाचगणीची ओळख करून देते.प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.डाॅ.सुनील पवार यांचे पाचगणीवरील संशोधन हे पाचगणीच्या माहितीचा खजिना आहे.
प्रसिध्द साहित्यिक जगन्नाथ शिंदे गुरूजी म्हणाले,डाॅ.सुनील पवार यांचे पाचगणीचा इतिहास हे संशोधनात्मक पुस्तक हे सत्यतेवर अवलंबून असलेने ते प्रमाणित आहे.हे पुस्तक शहरवासियांना,पर्यटकांना व अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.पाचगणीतील अनेक ज्ञात अज्ञात गोष्टी समजण्यास मदत होणार आहे.
प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले, महाविद्यालयात पाचगणीचा इतिहास पुस्तकरूपाने प्रसिध्द होतो आहे याचा अभिमान आहे.पर्यटक,विद्यार्थी,नागरिक या सर्वांना उपयुक्त ठरणारे असे पुस्तक आहे.डाॅ.सुनील पवार यांनी पाचगणीचा इतिहास लिहून नवोदितांना प्रेरणा दिली आहे.
यावेळी लेखक डाॅ.सुनील पवार,मुख्याधिकारी गिरीश दापकेकर,पोलीस निरीक्षक सतीश पवार,समन्वय समितीचे अध्यक्ष प्रविण भिलारे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अमर बिरामणे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक डाॅ.सुनिता गित्ते यांनी केले.सूत्रसंचालन प्रा माणिक वांगीकर यांनी केले.आभार डाॅ.अनंता कस्तुरे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक ,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment