Monday 17 January 2022

महेता कॉलेजमध्ये ज्ञानशिदोरी दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व ग्रंथवाटप उपक्रम संपन्न

















 पाचगणीः  येथील श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजमध्ये ग्रंथालय विभाग व  मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह,ज्ञानशिदोरी दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथप्रदर्शन व ग्रंथवाटप करण्यात आले. हा समारंभ डाॅ.बी.एन.कोकरे यांच्या हस्ते घेण्यात आला.यावेळी यावेळी ग्रंथालय विभागाचे प्रा.राजेंद्र खंडाईत,मराठी विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मकरंद सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

        महेता काॅलेजमध्ये श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून प्रत्येकवर्षी साजरा करण्यात येतो.यावर्षी ग्रंथालय विभाग व मराठी विभागाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन व ग्रंथवाटप हे उपक्रम राबविण्यात आले.ग्रंथप्रदर्शनाचे उद् घाटन डाॅ.बी.एन.कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच  गौतम बुध्द,राजर्षी शाहू महाराज,स्वामी विवेकानंद,महाराजा सयाजीराव गायकवाड,लाल बहादूर शास्री यांच्या चरित्रात्मक ग्रंथांचे वाटप डाॅ.बी.एन.कोकरे,प्रा.जयंत शिंदे,डाॅ.प्रियदर्शनी कांबळे,प्रा.मकरंद सकटे यांच्या हस्ते  विद्यार्थ्यांना करण्यात आले.प्रांरभी स्वामी विवेकानंद,शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे,संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे,ग्रंथालय शास्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ग्रंथप्रदर्शन पाहून अभिप्राय नोंदविले. 
         प्रास्ताविक डाॅ.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार प्रा.राजेंद्र खंडाईत यांनी मानले.ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन श्री.पंढरीनाथ भिलारे व बिरा घोगरे यांनी केले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.    

No comments:

Post a Comment