Thursday 13 January 2022

गावोगावी वैज्ञानिक साहित्याचा जागर व्हावाः डाॅ.नीलेश तरवाळ













 पाचगणीः जागतिक स्तरावर वैज्ञानिक साहित्य हे कथा,शोधनिबंध,लेख,कादंबरी आदी साहित्य प्रकारातून लिहिले जात आहे.नवीन तंत्रज्ञान,शोध,बदलते पर्यावरण आदी विषयाबाबत साहित्यातून जनजागृती होणे काळाची गरज आहे.नवोदित संशोधक व साहित्यिकांनी वैज्ञानिक साहित्याचा जागर गावोगावी करावा असे आवाहन युवा शास्रज्ञ डाॅ.नीलेश तरवाळ यांनी केले.
      श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये विवेकानंद जयंती सप्ताह,मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व जागतिक विज्ञान साहित्य दिवस निमित्ताने इंग्रजी,मराठी व हिंदी विभागाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय वेबिनारमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे होते.या वेबिनारमध्ये इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.जयंत शिंदे,हिंदी विभाग प्रमुख प्रा.नरेंद्र फडतरे,मराठी विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,तंत्रसहाय्यक व वेबिनारचे संयोजक डाॅ.सुनील गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
      प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.किरण शिंदे म्हणाले,वैज्ञानिक साहित्यामध्ये पर्यावरण,सौर उर्जा,प्रदूषण,जलसंवर्धन अशा अनेक विषयांचे चित्रण आढळते.युवकांनी व संशोधकांनी वैज्ञानिक साहित्याच्या चळवळीत सहभागी होवून साहित्याला गती द्यावी.
     वेबिनारचा प्रारंभ शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे लिखित संस्था प्रार्थनेने करण्यात आला.प्रास्ताविक डाॅ.अनंता कस्तुरे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.जयंत शिंदे यांनी करून दिला.सूत्रसंचालन व तंत्रसहाय्य डाॅ.सुनील गुरव यांनी केले.आभार डाॅ.शहाजी जाधव यांनी मानले.वेबिनारला प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment