Tuesday 18 February 2020

साहित्य व चित्रपट निर्मितीतून सामाजिक परिवर्तन घडवावेःडाॅ.विनायक पवार















साहित्य व चित्रपट निर्मितीतून सामाजिक परिवर्तन घडवावेःडाॅ.विनायक पवार

पाचगणीः समाजामध्ये नैतिक मूल्यांचे घसरण वाढत चालले आहे.त्यामुळे सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आदी प्रश्न नव्याने निर्माण होत आहेत.समाजातील सामाजिक प्रश्न सोडविण्याची क्षमता साहित्य व चित्रपटनिमिर्तीतआहे.साहित्यिकांनी साहित्य व चित्रपट निर्मितीतून समाजात सामाजिक परिवर्तन घडवावे आणि नवसमाजनिर्मिती करावी,असे प्रतिपादन प्रसिध्द कवी व चित्रपट गीतकार डाॅ.विनायक पवार यांनी व्यक्त केले.

    श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये वार्षिक पारितोषिक व बक्षिस वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. अरूण गाडे होते.यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर बिरामने,युवाउद्योजक नितीन भिलारे,संजय आंब्राळे,रोटरी कल्बचे सचिव सुनिल कांबळे, सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ.शहाजी जाधव,कार्याध्यक्ष प्रा.नरेंद्र फडतरे,जिमखाना प्रमुख प्रा.दत्तात्रय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
   डाॅ.विनायक पवार यांनी सादर केलेल्या कविता व चित्रपट गितांना रसिकांनी मनमुराद दाद दिली.प्रारंभी प्रमुख मान्यवरांना हस्ते शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रिडा आदी क्षेत्रात यशप्राप्त विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना बक्षिसे देण्यात आली.यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.प्रास्ताविक प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी केले.पाहुण्यांची ओळख डाॅ.तुकाराम राबाडे यांनी करून दिली.कार्याध्यक्ष प्रा.नरेंद्र फडतरे यांनी अहवाल वाचन केले.जिमखाना प्रमुख प्रा.दत्तात्रय मोहिते यांनी क्रिडा अहवाल सादर केला.सूत्रसंचालन डाॅ.प्रियदर्शनी कांबळे व प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार डाॅ.गोपीनाथ बोत्रे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटोओळीः महेता काॅलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलताना डाॅ.विनायक पवार,बाजूस प्राचार्य डाॅ.अरूण गाडे,माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे आदी

No comments:

Post a Comment