Wednesday 12 February 2020

तरूणांनी कृषी क्षेत्रात रोजगारनिर्मिती करावीःप्रकाशराव कुतवळ
















तरूणांनी कृषी क्षेत्रात रोजगारनिर्मिती करावीःप्रकाशराव कुतवळ
 
पाचगणीः मराठी तरूणांना कृषी क्षेत्रात रोजगार व उद्योग निर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.कृषीमधील नवीन बदल व गरजा लक्षात घेवून तरूणांनी करिअर घडविण्यासाठी पुढे यावे,असे प्रतिपादन  उर्जा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाशराव कुतवळ यांनी व्यक्त केले. 
   श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी काॅलेज योजना अंतर्गत काॅमर्स विभागाने आयोजित केलेल्या " कृषीउद्योगातील करिअरच्या  संधी  " या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी काॅमर्स विभागप्रमुख डाॅ.गोपीनाथ बोत्रे,अग्रणी काॅलेजचे प्रमुख प्रा.संतोष निलाखे,प्रा.प्रशांत सुतार,डाॅ.आलिम जाफर यांची प्रमुख उपस्थिती होती.
      प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,ग्रामीण तरूणांनी शेती व पूरक व्यवसायाकडे रोजगार व उद्योग म्हणून पाहावे.शेतीतील उत्पादनाची बाजारपेठ गावोगावी निर्माण करावी आणि त्यानुसार बाजारपेठ निर्माण करावी.
    प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डाॅ.गोपीनाथ बोत्रे यांनी करून दिली.सूत्रसंचालन सरिता चोपडे हिने केले.आभार सुजाता मालुसरे हिने मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटोओळीः महेता काॅलेजमध्ये कार्यशाळेत बोलताना उद्योजक प्रकाशराव कुतवळ बाजूस प्राचार्य डाॅ.अरूण गाडे डाॅ.गोपीनाथ बोत्रे आदी

No comments:

Post a Comment