Thursday 19 December 2019

रोट्रॅक्ट क्लबच्या सामाजिक कार्याचा वारसा घरोघरी निर्माण करा : अॅड उमेश सणस

रोट्रॅक्ट क्लबच्या सामाजिक कार्याचा वारसा घरोघरी निर्माण करा : अॅड उमेश सणस

महेता काॅलेजमध्ये रोट्रॅक्ट क्लब सनद व पदग्रहण समारंभ संपन्न












पाचगणी: देशाला आणि समाजाला सामाजिक कार्याची खूप गरज आहे.युवकांनी रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वारसा व वसा घरोघरी निर्माण करावा.हे सामाजिक कार्यच देशाला बलवान बनवेल असे प्रतिपादन अॅड उमेश सणस यांनी व्यक्त केले.
     श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये रोट्रॅक्ट क्लब सनद प्रदान व पदग्रहण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी रोटरी अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि होते.यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ अरुण गाडे,  रोटरीचे सचिव सुनील कांबळे,सदस्य जयवंत भिलारे, राजेंद्र भगत,भारत पुरोहित,आंद्रे सवार्ड,विनिता प्रसाद सक्सेना,गोपाळ राठोड,महेंद्र पांगारे,अमित भिलारे,स्वप्निल परदेशी,किरण पवार,लेसन आजादी,भूषण बोधे,स्वप्नील परदेशी, डाॅ.शहाजी जाधव,प्रा.अनंता कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     शाहाराम जवानमर्दि म्हणाले,युवकांच्यात सामाजिक कार्याची आवड निर्माण होते आहे,युवक स्वःइच्छेने सामाजिक कार्यात सहभागी होतात ही बाब खूप प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून युवकांनी सामाजिक कार्य करून समाजात परिवर्तन घडवावे.
  प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,महाविद्यालयीन युवकांच्यात सामाजिक कार्याची बांधिलकी निर्माण करण्यात रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लबचा पुढाकार खूप महत्वाचा व समाजाला दिशा देणारा आहे.युवकांनी सामाजिक कार्यातून समाजसेवा करावी.
  यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष योगेश शेरे,सचिव रोहित भोसले व सर्व सदस्यांना रोट्रॅक्ट क्लबची सनद प्रदान करण्यात आली तसेच विविध पदांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.
    प्रास्ताविक जयवंत भिलारे यांनी केले.स्वागत डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.पाहुण्यांची ओळख सुनील कांबळे यांनी करून दिली.रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षांची ओळख अर्पणा मोरे हिने तर सचिवाची ओळख श्रीदेवी पुजारी हिने करून दिली.आभार प्रतिक्षा जाधव हिने मानले.कार्यक्रमास रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लबचे पदाधिकारी,सदस्य तसेच प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment