Saturday 5 October 2019

NEWS - कागदी आपट्याच्या पानांच्या भित्तिपत्रिकेतून केली पर्यावरणविषयक जनजागृृृृती


        






पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील वनस्पतीशास्र विभागाच्यावतीने जागतिक शिक्षक दिन व दसरा यानिमित्त " आला आला दसरा,आपट्याची पाने तोडायची आता विसरा " यासह पर्यावरण व स्री- भ्रूणहत्या विषयीच्या संदेशाची भित्तिपत्रिकेतून जनजागृती केली.प्राचार्य डाॅ.अरुण गाडे व वनस्पतीशास्र विभागप्रमुख डाॅ.बी.टी.दांगट यांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
     प्राचार्य डाॅ.अरुण गाडे म्हणाले,समाजात पर्यावरणपूरक दसरा साजरा करण्यासाठी वनस्पतीशास्र विभागाने भित्तिपत्रिकेतून केलेली जनजागृती प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.वृक्षसंवर्धन,स्री- भ्रूणहत्या,जलवर्धन,पर्यावरण संरक्षण आदीविषयी केलेले प्रबोधन पर्यावरण संरक्षणास उपयुक्त असे आहे.
  डाॅ.बी.टी.दांगट म्हणाले,युवकांनी पर्यावरणपूरक दसरा साजरा करून समाजात पर्यावरणविषयक जनजागृती करावी.भित्तिपत्रिकेतील आपट्याची पाने ही रद्दीच्या कागदापासून तयार केली आहेत.प्रत्येक पानावर मराठी,हिंदी,इंग्रजी व उर्दू भाषेत वृक्षसंवर्धन,बेटी बचाव,निसर्ग वाचवा असे पर्यावरण जागृतीचे संदेश दिले आहेत."आला आला दसरा,आपट्याची पाने तोडायची आता विसरा "अशी जागृती करत दसरा उत्सव साजरा करावा असे आवाहनही डाॅ.दांगट यांनी केले.
    भित्तिपत्रिकेचे संकलन वृशभ कदम,शुभम भिलारे,नितेश शिंदे,कृषिकेश सपकाळ यांनी केले.प्रास्ताविक डाॅ.बी.टी.दांगट यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे यांनी केले.आभार प्रा.स्नेहल गायकवाड यांनी मानले.संयोजन प्रा.मोहिनी माने व प्रा.उदय चौगुले यांनी केले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment