Wednesday 2 October 2019

महेता काॅलेजमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त " माझे महाविद्यालय स्वच्छ महाविद्यालय "उपक्रम


















पाचगणीः महेता काॅलेजमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त " माझे महाविद्यालय स्वच्छ महाविद्यालय " उपक्रम राबविण्यात आला.प्राचार्य डाॅ.अरूण गाडे,प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेची शपथ घेतली.
     महाविद्यालयातील राष्टीृय सेवा योजना विभागाच्यावतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.प्रांरभी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत प्राचार्य डाॅ.अरूण गाडे,प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.महाविद्यालय परिसरातील केरकचरा,गवत तसेच शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली.यावेळी माझे महाविद्यालय,माझा परिसर स्वच्छ ठेवण्याची सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
   प्राचार्य डाॅ.अरुण गाडे म्हणाले,महात्मा गांधीजीचे सत्य,अहिंसा,माणुसकी आदी विचार प्रेरणादायी आहेत.जगाने त्यांचे तत्वज्ञान स्विकारले आहे.तरूणांनी गांधीजींचे विचार आत्मसात करून तसे जीवन जगले पाहिजे.गांधीजीकडून समाजाचा विकास करण्याचा वसा व वारसा घेतला पाहिजे.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले.

      

No comments:

Post a Comment