Thursday, 26 December 2019

युवकांनी व्यावसायिक कौशल्यातून करिअर घडवावे: अभिषेक घागरे

युवकांनी व्यावसायिक कौशल्यातून करिअर घडवावे : अभिषेक घागरे         
                   
 पाचगणी:युवकांनी पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच आवडणारी विविध व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावित.ही कौशल्येच व्यक्तिमत्वाचा विकास करून करिअर घडवतील,असे प्रतिपादन उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था वाईचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक घागरे यांनी व्यक्त केले.
   पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये अर्थशास्र विभाग व प्लेसमेंट सेल यांच्यावतीने आयोजित 'करिअर कौशल्ये ' याविषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी अर्थशास्र विभागप्रमुख प्रा.सतिश कुदळे,डाॅ.तुकाराम राबाडे,काॅमर्स विभागप्रमुख डाॅ.जी.एस.बोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,विद्यार्थ्यांनी जीवनात महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.जीवनात यशस्वी होण्यासाठी व करिअर घडविण्यासाठी विविध कोर्सेस उपयुक्त ठरतात. 
    प्रास्ताविक डाॅ.तुकाराम राबाडे यांनी केले.आभार प्रा.सतिश कुदळे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Thursday, 19 December 2019

रोट्रॅक्ट क्लबच्या सामाजिक कार्याचा वारसा घरोघरी निर्माण करा : अॅड उमेश सणस

रोट्रॅक्ट क्लबच्या सामाजिक कार्याचा वारसा घरोघरी निर्माण करा : अॅड उमेश सणस

महेता काॅलेजमध्ये रोट्रॅक्ट क्लब सनद व पदग्रहण समारंभ संपन्न

पाचगणी: देशाला आणि समाजाला सामाजिक कार्याची खूप गरज आहे.युवकांनी रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वारसा व वसा घरोघरी निर्माण करावा.हे सामाजिक कार्यच देशाला बलवान बनवेल असे प्रतिपादन अॅड उमेश सणस यांनी व्यक्त केले.
     श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये रोट्रॅक्ट क्लब सनद प्रदान व पदग्रहण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी रोटरी अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि होते.यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ अरुण गाडे,  रोटरीचे सचिव सुनील कांबळे,सदस्य जयवंत भिलारे, राजेंद्र भगत,भारत पुरोहित,आंद्रे सवार्ड,विनिता प्रसाद सक्सेना,गोपाळ राठोड,महेंद्र पांगारे,अमित भिलारे,स्वप्निल परदेशी,किरण पवार,लेसन आजादी,भूषण बोधे,स्वप्नील परदेशी, डाॅ.शहाजी जाधव,प्रा.अनंता कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     शाहाराम जवानमर्दि म्हणाले,युवकांच्यात सामाजिक कार्याची आवड निर्माण होते आहे,युवक स्वःइच्छेने सामाजिक कार्यात सहभागी होतात ही बाब खूप प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून युवकांनी सामाजिक कार्य करून समाजात परिवर्तन घडवावे.
  प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,महाविद्यालयीन युवकांच्यात सामाजिक कार्याची बांधिलकी निर्माण करण्यात रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लबचा पुढाकार खूप महत्वाचा व समाजाला दिशा देणारा आहे.युवकांनी सामाजिक कार्यातून समाजसेवा करावी.
  यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष योगेश शेरे,सचिव रोहित भोसले व सर्व सदस्यांना रोट्रॅक्ट क्लबची सनद प्रदान करण्यात आली तसेच विविध पदांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.
    प्रास्ताविक जयवंत भिलारे यांनी केले.स्वागत डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.पाहुण्यांची ओळख सुनील कांबळे यांनी करून दिली.रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षांची ओळख अर्पणा मोरे हिने तर सचिवाची ओळख श्रीदेवी पुजारी हिने करून दिली.आभार प्रतिक्षा जाधव हिने मानले.कार्यक्रमास रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लबचे पदाधिकारी,सदस्य तसेच प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Saturday, 14 December 2019

Thursday, 12 December 2019

युवकांनी रोट्रॅक्ट क्लबच्यामाध्यमातून सामाजिक क्रांती घडवावीःसंतोष शिंदे

युवकांनी रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडवावीः संतोष शिंदे

 पाचगणीः रोट्रॅक्ट क्लब ही सामाजिक कार्य आणि सामाजिक जाणिवा निर्माण करणारी संघटना आहे.या संघटनेने वैयक्तिक जीवनात व समाजात परिवर्तन घडविले आहे.या क्लबच्या वृक्षारोपन,स्वच्छता,शिबीरे,जलसंधारण अशा विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होवून युवकांनी समाजात सामाजिक क्रांती घडवावी,असे मत सातारा रोटरी क्लबचे डीआरआर मा.संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
     श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये राष्टीृय सेवा योजना अंतर्गत रोट्रॅक्ट क्लब आयोजित "सामाजिक सेवा आणि व्यक्तीमत्व विकास " या विषयावरील उजळणी वर्गामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी रोटरी क्लब आॅफ पाचगणीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि ,सचिव सुनील कांबळे,मा.प्राचार्य जयवंतराव चौधरी,जयवंत भिलारे,भारत पुरोहित,राजेंद्र भगत,अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
     प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,सामाजिक क्रांती व परिवर्तनात युवकांचा सहभाग महत्वाचा ठरत असतो.रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून गावागावात सामाजिक कामांचे जाळे निर्माण करूयात.महाविद्यालय विद्यार्थ्यांवर सातत्याने सामाजिक कार्याचा संस्कार करीत वारसा जपत आले आहे.या चळवळीत सर्वांनी सहभागी होवून परिवर्तन घडविले पाहिजे.
     शाहाराम जवानमर्दि म्हणाले,सामाजिक कार्यात सहभागी होवून युवकांनी समाजउपयोगी उपक्रम राबवावेत.रोटरी क्लब सामाजिक कार्यात सर्वतोपरीने मदत व सहकार्य करेल.
     संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना वाचन, भाषण,लेखन,अभिनय,संभाषण आदीबाबत प्रशिक्षण दिले आणि सामाजिक कार्यासाठी आवश्यक कौशल्येही सांगितली.प्रास्ताविक मा.प्राचार्य जयवंतराव भिलारे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार जयवंत भिलारे यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन प्रा.जयंत शिंदे,प्रा.नरेंद्र फडतरे ,प्रा.सुनील नवघरे यांनी केले.

Tuesday, 26 November 2019

भारतीय संविधानाचा प्रत्येकांनी गौरव करावाः प्राचार्य डाॅ.अरूण गाडे

भारतीय संविधानाचा प्रत्येकांनी गौरव करावाः प्राचार्य डाॅ.अरूण गाडे

पाचगणीःभारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ असे संविधान आहे.महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानातून प्रत्येकाला शैक्षणिक,सामाजिक,राजकीय असे सर्व प्रकारचे हक्क व कर्तव्ये दिली आहेत त्यामुळेच सर्वसामान्यांना न्याय मिळतो आहे.अशा संविधानाचा प्रत्येकांनी गौरव करायला हवा असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी व्यक्त केले.
   पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात "भारतीय संविधान आणि आपली कर्तव्ये " या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी डाॅ बी.एम.कोकरे,स्टाफ सेक्रेटरी प्रा.जयंत शिंदे,सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ.शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रारंभी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे व विद्यार्थ्यांच्या हस्ते भारतीय संविधान ग्रंथ आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार प्रा.जयंत शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.